Nitin Raut on Electricity Worker Strike  Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्य अंधारात जाणार का? ऊर्जामंत्र्यांनी दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : खासगीकरणाच्या विरोधात देशव्यापी संप पुकारला आहे. यामध्ये वीज कर्मचाऱ्यांनी (Electricity Worker Strike) देखील सहभाग घेतला आहे. तसेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे (WCL) कर्मचारी देखीस संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्य अंधारात जाईल का? अशी भीती निर्माण झाली आहे. त्याबाबतच ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी उत्तर दिलं आहे. (Nitin Raut on Electricity Worker Strike)

आम्ही देखील खासगीकरणाच्या विरोधात आहोत. पण, खासगीकरणाचा डाव आखून संप पुकारत असतील तर आम्ही कारवाई करू, असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. वीज कर्मचाऱ्यांसोबत बैठक असून उद्या सकारात्मक चर्चा होईल. राज्य अंधारात जाईल, अशी परिस्थिती राज्यावर येऊ देणार नाही, असं आश्वासन संघटनांनी दिलं असल्याचं नितीन राऊतांनी सांगितलं.

'...तर मेस्माअंतर्गत कारवाई करू' -

संपात उतरलेल्या संघटनांना विनंती आहे की त्यांनी चर्चेतून तोडगा काढावा. सध्या शेतीचा हंगाम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आम्ही चर्चेला तयार आहोत. आर्थिक संकटात असताना यावर मात करत आम्ही पुढे जात आहोत. कोरोना काळात वीज कर्मचाऱ्यांनी समोर येऊन सेवा केली हे मान्य आहे. आज वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. त्यावर तोडगा निघेल असं वाटतं. मात्र, कोणीही समजू नये की आम्ही संप करू तर आम्हाला कोणीही अडविणार नाही. सरकार कठोर होईल आणि मेस्माअंतर्गत कारवाई करू, असा इशारा नितीन राऊतांनी दिला आहे.

वीजनिर्मितीवर परिणाम होणार का? -

वीज निर्मितीवर याचा संपूर्ण परिणाम होणार आहे. वीज ग्रीडवर देखील परिणाम होईल. आमच्यासमोर कोळशाचं मोठं सकट आहे. नाशिकमध्ये दोन प्लांट बंद झालेत. त्यामुळे लोडशेडींग करण्यात आले. त्यामुळे कुठल्याही संघटनांनी राज्य सरकारला वेठीस धरू नये. एक पाऊल मी पुढे येतो आणि एक पाऊल तुम्ही पुढे या, असं आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केलं आहे. तसेच संप कायम राहिल्यास वीजनिर्मितीवर परिणाम होईल, अशी चिंताही ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT