Nivrutti Maharaj Indurikar Kirtan esakal
महाराष्ट्र बातम्या

Indurikar Maharaj : 'खरं बोलण्याची फळं भोगतोय'! इंदूरीकर महाराज कडाडले

समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार म्हणून लोकप्रिय असणाऱ्या निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते.

युगंधर ताजणे

Nivrutti Maharaj Indurikar Kirtan : समाजप्रबोधनकार आणि कीर्तनकार म्हणून लोकप्रिय असणाऱ्या निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते. आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंदूरीकर महाराजांना त्यांच्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचे दिसून आले आहे.

इंदूरीकर महाराजांनी त्यांच्या एका कीर्तनामध्ये महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना कायदेशीर कारवाईला देखील सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता जळगावातील कीर्तन महोत्सवात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्याबाबत जे काही घडलं त्याविषयी भाष्य केले आहे. त्या कीर्तनच्या क्लिप्सही व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. एबीपी माझा मराठीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

इंदूरीकर महाराजांनी त्या कीर्तनामध्ये म्हटलं आहे की, आपण नेहमीच खरं बोलतो त्यामुळे लोकं आपल्याला शिव्या देतात. खरं बोलण्याची आपण फळ भोगली आहेत. पण यासगळ्यात आजच्या काळात खरं बोलण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. असा एखादा माणूस राहिला नाही की ज्यानं मला शिव्या दिल्या नाहीत. माझा एकच गुन्हा की मी खरं बोलतो.

मी थेट आणि स्पष्टपणे बोलतो याचे लोकांना वाईट वाटते हे मला माहिती आहे. पण तसे बोलणे ही काळाची गरज आहे. मी जे बोलतो त्याला पर्याय नाही. अशा शब्दांत इंदूरीकर महाराजांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना खडसावले आहे. आपल्या कीर्तनातून आणि नेहमीच लोकांना खडे बोल सुनावणाऱ्या इंदूरीकर यांच्या कीर्तन आणि समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमांना नेहमीच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक आपल्या कीर्तनसेवेतून महाराष्ट्रातील भाविक-भक्तांचे प्रेम मिळवणाऱ्या इंदूरीकर महाराजांना गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यामुळे ट्रोल केले जात असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT