NMMS-Exam sakal
महाराष्ट्र बातम्या

आठवीच्या NMMS परीक्षेसाठी मुदतवाढ

परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना रविवार (ता.१) पर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या आधारे वितरित करण्यात येते. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी घेतल्यानंतर ही निवड घोषित करण्यात येते. मराठी, हिंदी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड आणि तेलगू या माध्यमांतून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते.

महत्त्वाच्या तारखा

  • - ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत : १ मे

  • - विलंबासहीत : ६ मे

  • - परीक्षा : १९ जून

संकेतस्थळ : https://www.mscepune.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT