उजनी धरण  esakal
महाराष्ट्र बातम्या

जलसंपदाकडून मान्यता मिळेना! उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास अधीक्षक अभियंत्यांनी मागितली मंजुरी; औज कोरडा, नदीकाठ तहानला, धरणात 77 TMC पाणी

आगामी हंगामात पावसाचे प्रमाण असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत यंदा एकदाच पाणी सोडले आहे. आता उन्हाचा तडाखा वाढल्याने भीमा नदीकाठ तहानला आहे. शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडण्याची मागणी वारंवार केली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : यंदा भीमा नदीतून एकदाच पाणी सोडण्यात आले आहे. आता भीमा नदी पात्र कोरडेठाक असून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा देखील कोरडा पडला आहे. भीमेतून पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. अधीक्षक अभियंत्यांनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव १६ एप्रिल रोजी जलसंपदा विभागाला पाठविला आहे.

आगामी हंगामात पावसाचे प्रमाण असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत यंदा एकदाच पाणी सोडले आहे. आता उन्हाचा तडाखा वाढल्याने भीमा नदीकाठ तहानला आहे. शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडण्याची मागणी वारंवार केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही पाणी सोडले जाईल, असे आश्वस्त केले आहे.

त्यानुसार सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुवीरेंद्र सखाराम खांडेकर यांनी १६ एप्रिल रोजी जलसंपदा विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास मान्यता द्यावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. मात्र, जलसंपदा विभागाने अजून त्याला मंजुरी न दिल्याने भीमा नदीत पाणी कधी सोडले जाणार, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.

पाच-साडेपाच टीएमसी पाण्याचे आवर्तन

सध्या धरणात एकूण ७७ टीएमसी पाणी असून त्यात साडेतेरा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. आता नदीतून पाणी सोडण्यासाठी पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. नदीवर अवलंबून अनेक गावांचा पाणीपुरवठा नदीत पाणी नसल्याने विस्कळीत झाला आहे.

गतवर्षी धरण उणे ४.७३ टक्के

मागच्या वर्षी २१ एप्रिल रोजी उजनी धरणात ६१.१२ टीएमसी पाणी होते. धरणात उपयुक्त पाणीसाठा उणे ४.७३ टक्के होता. यंदा मंगळवारी (ता. २१) उजनीत ७७.१५ टीएमसी पाणी असून उपयुक्त पाणीसाठा २५.१८ टक्के (१३.४९ टीएमसी) आहे. सध्या शेतीसाठी कालव्यातून, बोगद्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT