bird flu alert Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bird Flu : ''वेहलोळी वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण नाही''

संसर्ग रोखण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना केल्या जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिली आहे. बर्ड फ्लूचा प्रार्दूभाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यकत्या उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. (Bird Flu Infection In Thane District )

प्रादुर्भाव असलेले ठिकाण संसर्गग्रस्त क्षेत्र घोषित

दरम्यान, प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणाला संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच बर्ड फ्लू चा (Bird Flu) प्रादुर्भाव आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी नष्ट करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून पथकाच्या देखरेखीखाली २३,४२८ कुक्कुट पक्षी, १,६०३ अंडी, ३,८०० किलो खाद्य आणि १०० किलो शेल ग्रीट नष्ट करण्यात आले आहेत.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तृक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात मर्तृक झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयातील कॉल सेंटर क्र. १९६२ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT