Nawab Malik  sakal media
महाराष्ट्र बातम्या

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार? नवाब मलिक म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. येत्या काही महिन्यांवर मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुका (Municipal Corporation Election) येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याबाबातच मंत्री नवाब मलिकांनी (Maharashtra Minister Nawab Malik) माहिती दिली आहे.

देशातील इतर नऊ राज्यात आरक्षण टिकले. आता त्यानुसार न्यायालयान प्रतिज्ञापत्र सादर होणार आहे, असं नवाब मलिकांनी सांगितलं आहे. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द झाला नाही. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये ही आमची भूमिका आहे. पण, सरसकट सर्वच निवडणुका थांबविणे शक्य नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. ९ ते १० राज्यात आरक्षणासंबंधित समान आदेश लागू आहे. मात्र, आपल्याच राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द केले हे योग्य नाही. जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, अशी विनंती आम्ही सर्वोच्च न्यायालयाला करणार आहोत, असं शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Environmental Ethics India : ‘हरित हिंदुत्व’; सनातन तत्त्वज्ञान, संयमित उपभोग आणि पर्यावरणपूरक विकासाचा मार्ग

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 मे 2026

साप्ताहिक राशिभविष्य : (३ मे २०२६ ते ९ मे २०२६)

मेष साप्ताहिक राशिभविष्य (३ मे २०२६ ते ९ मे २०२६) : अपयश धुऊन काढाल

Gulabjam City: जिभेवर ठेवताच विरघळणारा 'शाही' गोडवा! 'या' शहराला म्हणतात 'गुलाबजामची राजधानी'; ८५ वर्षांपासून जपलीये चव!

SCROLL FOR NEXT