sakal exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

अनाथ मुलांना १४ महिन्यांपासून नाही अनुदान! बालसंगोपन योजनेची स्थिती; बचत गटातील विधवा, परितक्त्या महिलांना ‘डीपीसी’च्या निधी प्रतीक्षा

कोरोनात अनेक मुलांचा आधार हिरावला गेला. बालसंगोपन योजनेत त्या मुलांचाही समावेश आहे. तरीदेखील काहींना मार्च २०२३ तर काहींना ऑक्टोबर २०२२पासून एक दमडीही मिळालेली नाही. पालकांविना जगणाऱ्या मुलांना वर्षभरापासून मदत मिळाली नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारच्या बालसंगोपन योजनेतून एक किंवा दोन्ही पालक नसलेल्या अनाथ मुलांना (१८ वर्षांपर्यंत) दरमहा २२५० रुपयांचे अर्थसहाय दिले जाते. त्यातून त्या मुलांच्या शिक्षणासह इतर बाबींसाठी मदत होते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील जवळपास तीन हजार अनाथ मुलांना मागील १४ महिन्यांपासून बालसंगोपन योजनेची मदत मिळालेली नाही.

सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे तीन हजार अनाथ मुले (एक पालक नाही किंवा दोन्ही पालक नसलेली मुले) बालसंगोपन योजनेतून मदत घेतात. सध्या दररोज आठ ते दहा जणांचे अर्ज कार्यालयाकडे प्राप्त होतात. पण, निधीअभावी अनेक अर्जांवर कार्यवाहीच झाली नाही किंवा विलंबाने कार्यवाही होत असल्याची वस्तुस्थिती आहे.

कोरोना काळात अनेक मुलांचा आधार हिरावला गेला असून या योजनेत त्या मुलांचाही समावेश आहे. तरीदेखील काहींना मार्च २०२३ तर काहींना ऑक्टोबर २०२२ पासून एक दमडीही मिळालेली नाही. पालकांविना जीवन जगणाऱ्या मुलांना वर्षभरापासून मदत मिळाली नसल्याने त्यांचे हाल होत असल्याचेही चित्र आहे. आता हा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून थेट लाभार्थींच्या खात्यात जमा केला जाणार असल्याने विलंब लागत असल्याचे अधिकारी सांगतात. पण, तब्बल १० ते १४ महिने एवढा विलंब त्यासाठी लागतो का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘डीपीसी’तून ४.२७ कोटींची मागणी

कोरोना काळात विधवा, परितक्त्या झालेल्या महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गतवर्षी बचत गटांमधील १४० महिलांना स्वत:चा व्यवसाय करता यावा म्हणून विक्री केंद्रे (प्रत्येकी २.८५ लाख रुपये) देण्यात आली आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही महिलांनी भाजीपाला, स्टेशनरी वस्तू, जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू केली. या पार्श्वभूमीवर आता यावर्षी १५० महिलांना विक्री केंद्रे देण्यासाठी महामंडळाने जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटी २७ लाख ७४ हजार रुपयांचा निधी मागितला आहे. पण, अद्याप निधी मिळालेला नाही. प्रस्तावाला अजूनही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT