Pankaja Munde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : 'बिन बुलाये मेहमान'; पंकजा मुडेंना भाषणासाठी केवळ मिनिटभर वेळ

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची काल औरंगाबादमध्ये सभा पार पडली

सकाळ डिजिटल टीम

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची काल औरंगाबादमध्ये सभा पार पडली. याच कार्यक्रम पत्रिकेत पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांचं नाव नसल्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा चांगलीच रंगली होती. परंतु, या सभेला मुंडे बहिणींना निमंत्रण न दिल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चाही रंगू लागल्या होत्या. निमंत्रण नसतानाही पंकजा मुंडे कार्यक्रमाला गेल्या आणि नाराज असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.

त्यानंतर कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलण्यासाठी फक्त दोनच मिनीटे वेळ देण्यात आला होता. या दोन मिनिटांपैकी पंकजा मुंडे यांनी अवघ्या एका मिनिटात आपलं भाषण संपवलं. त्यामुळं त्या खरचं नाराज आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे. परंतु, मी नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सध्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. काल सकाळी चंद्रपूर येथे जे. पी. नड्डा यांची सभा पार पडली. त्यानंतर औरंगाबदमध्ये त्यांची सभा झाली. या सभेची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मराठवाड्यातील महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडेंना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. तरीही पंकजा मुंडेंनी कार्यक्रमाला हजार राहिल्या. त्यांना भाषणाला 2 मिनिटे वेळ दिला असताना मुंडेंनी एका मिनिटात आपलं भाषण आवरलं. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भाषणाला जास्त वेळ मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी यावेळी अत्यंत छोटं भाषण केलं आहे. पक्षाचा आदेश मानणं हे माझ्यावरचे संस्कार आहेत, असं पंकजा म्हणाल्या. तर आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन भाजपला जिंकवून देण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A vs Pakistan A: आज भारत-पाक क्रिकेट लढत; हस्तांदोलन न करण्याचे धोरण अ संघाकडूनही कायम

Teacher Recruitment: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय विद्यालयात 9000 पेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज कुठे अन् कसा करावा

IPL 2026च्या ऑक्शनची तारीख जाहीर, संघांना २३७ कोटी खर्च करता येणार, कधी आणि कुठे होणार लिलाव? वाचा

2026 Rashi Bhavishya : 2026 मध्ये या राशींना मिळणार छप्परफाड पैसा ! तुमचीही रास आहे का यात ?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT