rajesh tope Sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात लॉकडाऊनची गरज नाही : टोपे

या विधानामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जालना : कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या धोक्यामुळे जगभरातील अनेक देशात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यास सुरूवात झाली आहे. त्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यात लॉकडाऊन (Lockdown) लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ते ज्यालन्यात बोलत होते. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार देशातील इतर राज्यातून महाराष्ट्रात (Maharashtra) विमानाने येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस (Vaccination) घेतलेले असताना RTPCR चाचणी बंधनकारक असणार नाहीये. मात्र, धोकादायक असणाऱ्या देशांतून आलेल्यांना RTPCR चाचणी बंधनकारक असणारआहे. तसेच त्यांना ७ दिवस क्वारंटाईन राहणे बंधंनकारक असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत सातत्याने घट पाहण्यास मिथ होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (School reopening) आता १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात धोका असलेल्या देशांतून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून त्यात जर कुणाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.

राज्यात पहिल्या डोसच लसीकरण 82 टक्के झालं असून दुसऱ्या डोसच 44 टक्के लसीकरण झालं आहे. साडेसात कोटी लोकांना लसीचा पहिला डोस दिला असून साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला देण्यात आला अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. राज्यात लसीकरण वेगाने सुरु असून टारगेट पूर्ण होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरूच राहील असंही ते म्हणाले. सद्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारख कोणतंही कारण नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही असंही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT