Karnataka SSLC 10th Exam

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

परीक्षेत कॉपी नकोच! दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठीही आता भरारी पथके; प्रत्येक पथकावर 4 शाळांच्या भेटीचे अन्‌ फोटो पाठविण्याचे बंधन

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक २३ जानेवारीपासून सुरु होत आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक २ फेब्रुवारीपासून आहे. यंदा पहिल्यांदाच बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा पारदर्शक व्हावी, यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक भरारी पथकाला किमान चार शाळांना भेटी द्याव्याच लागणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक २३ जानेवारीपासून सुरु होत आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक २ फेब्रुवारीपासून आहे. यंदा पहिल्यांदाच बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा पारदर्शक व्हावी, यासाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक भरारी पथकाला किमान चार शाळांना भेटी द्याव्याच लागणार आहेत. त्यावेळी त्या शाळांमधील लॅब, प्रयोगशाळेचे फोटो, जर्नल, विद्यार्थी प्रयोग करतानाचे फोटो बोर्डाला पाठवावे लागणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १२० तर दहावीच्या विद्यार्थ्यांची १८८ परीक्षा केंद्रे असणार आहेत. प्रत्येक केंद्राला पक्के वॉल कंपाऊंड आहे. तेथील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत आणि परीक्षेवेळी शाळा परिसरात ड्रोन वापरला जाणार आहे. लेखी परीक्षेवेळी पर्यवेक्षकांमध्येही सरमिसळ (आपल्या शाळेचे विद्यार्थी ज्या केंद्रांवर नाहीत तेथे पर्यवेक्षक) असणार आहे.

तत्पूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षेतही बोर्डाने लक्ष घातले आहे. प्रत्येक शाळांवर जाणाऱ्या बहिस्थ: परीक्षकांची नावे बोर्डाकडूनच अंतिम केली जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी अचानक भेटी देणाऱ्या भरारी पथकात गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी असणार आहेत.

संनियंत्रण कक्षातून अधिकाऱ्यांचे लक्ष

इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पारदर्शक होण्यासाठी बोर्डाने काही बदल केले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आता अनुदानित शाळांवरील शिक्षक बहिस्थ: परीक्षक म्हणून खासगी स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवर जातील. स्वयंअर्थसहाय्यिता शाळांवरील शिक्षक खासगी अनुदानित शाळांमधील प्रात्यक्षिक परीक्षा घेतील. लेखी परीक्षेत प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असेल. तेथील पर्यवेक्षकाचे मोबाईल झूमद्वारे जोडले जातील. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या संनियंत्रण कक्षातून वरिष्ठ अधिकारी परीक्षेवर लक्ष ठेवतील.

- औदुंबर उकीरडे, विभागीय अध्यक्ष, पुणे बोर्ड

लॅब, प्रयोगशाळेचे फोटो पाठवावे लागणार

प्रात्यक्षिक परीक्षेवेळी शाळांना भेटी देणाऱ्या भरारी पथकाने नेमकी काय माहिती पडताळायची, याचा नमुना बोर्डाने संबंधितांना दिला आहे. त्या शाळेत अद्ययावत लॅब आहे का, प्रयोगशाळेत प्रयोग होतात का, विद्यार्थ्यांनी जर्नल व्यवस्थित पूर्ण केली आहेत का, अशा बाबी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी तपासायच्या आहेत. त्यानंतर त्याचे जीओ टॅग फोटो बोर्डाला पाठवायचे आहेत. प्रत्येक शाळांमधील विषय शिक्षकांनाही त्याची माहिती व्हावी, यासाठी शनिवारी विषय शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात आज 5 ते 6 या वेळेत पुरुषांना प्रवेशबंदी; दर्शनासाठी महिलांना आधार कार्डही अनिवार्य, काय आहे कारण?

Gold Rate Today : सोनं-चांदीने मोडले सगळे रेकॉर्ड! गुंतवणूकदारांसाठी संक्रांत गोड; सर्वसामान्य चिंतेत; चांदी ३ लाखांवर! पाहा आजचे भाव

US Iran Trade Tariff : इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका लादणार २५ % टॅरिफ, भारतावर काय होणार परिणाम ?

Dnyanai Book : ज्ञानेश्वरीचा सुगम, पद्यमय अनुवाद ‘ज्ञानाई’ लवकरच उपलब्ध

इराणमध्ये २००० मृत्यू, ट्रम्प-नेतन्याहू मारेकरी; अमेरिकेनं ऐनवेळी बैठक रद्द केल्यानं भडकले इराणचे NSC

SCROLL FOR NEXT