Lockdown Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात पुन्हा लॉकडाउन नको

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकसकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राच्यावतीने वेबिनारचे आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा प्रभावी उपाय आहे. योग्य वेळेत लसीकरण झाले, तर या वर्षाच्या अखेरपर्यंत स्थिती पूर्वपदावर येईल,’ असा विश्‍वास ‘क्रेडाई’चे (Kredai) राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर (Satish Magar) व्यक्त केला. संपूर्ण राज्यात (Maharashtra) पुन्हा लॉकडाउन (Lockdown) करू नये, अशी मागणी राज्य सरकारकडे (State Government) करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष सुनील फुरडे (Sunil Furade) यांनी सांगितले. (No more lockdown in the state)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकसकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राच्यावतीने वेबिनारचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. या वेबिनारमध्ये देशातील ८५४ विकसकांनी हजेरी लावली. क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतिलाल कटारिया, अनंत राजेगावकर, सल्लागार मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र ठक्कर, सचिव सुनील कोतवाल या वेळी उपस्थित होते.

मातृदिनाच्या निमित्ताने धुळे, रत्नागिरी, कराड, जळगाव, उस्मानाबाद आणि लातूर या सहा शहरांतील संघटनेच्या महिला विंगचे उद्घघाटन मगर यांच्या हस्ते करण्यात आले. कटारिया म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील अनेक घर खरेदीदारांना मालमत्ता नोंदणीसाठी चार महिन्यांची मुदत वाढ मिळावी आणि मुदतवाढीनंतर त्यावर कोणत्याही प्रकारचा दंड आकारू नये.’

कोरोनाचे वाढत रुग्ण पाहता उच्च न्यायालयाने संपूर्ण लॉकडाउन करण्यास सुचविले आहे. राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाउन लागू झाल्यास बांधकाम क्षेत्रावर थेट परिणाम होईल. यामुळे बांधकाम प्रकल्पांवर कोणतेही नवीन निर्बंध लादण्यात येऊ नये. टाळेबंदी टाळण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे.

- सुनील फुरडे, राज्य अध्यक्ष, क्रेडाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

Nita Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Latest Marathi News Live Update: बेंगळुरुमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

Kanha Tiger Reserve : जंगलाचा राजा 'कान्हा'मध्ये संकटात! जानेवारीपासून 25 वाघांनी गमावले प्राण, व्याघ्र प्रकल्पात नक्की काय घडतंय?

SCROLL FOR NEXT