Sanjay Raut on CM Eknath Shinde News Esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : "एकनाथ शिंदेंना कुणीच मुख्यमंत्री मानत नाही"

उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये होते, एकनाथ शिंदे 10मध्ये पण नाहीत

सकाळ डिजिटल टीम

CM Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांना कुणी मुख्यमंत्री मान नाही. त्यांचं नाव देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यामध्येही कुठे नाही. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये होते, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची प्रगती, विकास काहींना पाहावत नव्हता, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. सरकारने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाला विकत घेतलं आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत माध्यंमाशी बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना कुणी मुख्यमंत्री मानत नाही. त्यांचं नाव देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यामध्येही नाही हे दुर्देव आहे.

उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये होते, त्यानंतर ते पहिल्या चारमध्ये आले. हळूहळू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती पकडत असताना हे सरकार पाडण्यात आलं.

संजय राऊत माध्यंमाशी बोलताना म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना कुणी मुख्यमंत्री मानत नाही. त्यांचं नाव देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यामध्येही नाही हे दुर्देव आहे.

उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये होते, त्यानंतर ते पहिल्या चारमध्ये आले. हळूहळू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती पकडत असताना हे सरकार पाडण्यात आलं.

कुठेतरी महाराष्ट्राचे पंख कापले जावे, महाराष्ट्राची प्रगती आणि विकास काही लोकांना पाहवेना, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही आनंदउत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागा, अशा प्रकारची भाषा जर हे लोकं करीत असतील.

याचा अर्थ सुप्रीम न्यायालय आणि निवडणूक आयोगाला यांनी विकत घेतलं आहे का? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार याचा निकाल अजून लागायचा आहे आणि निकाल लागण्याआधीच या सर्वांनी (शिंदे-भाजप) जाहीर केलं आहे की आम्हीच जिंकतो आहे. याला काय म्हणायचं? असा प्रश्नही संजय राऊत यांनी बोलताना उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away : अजित पवार यांची निधनाच्या काही मिनिटं आधी सोशल मीडियावर पोस्ट, काय म्हणाले होते ?

Devasted, सुप्रिया सुळेंचं व्हॉटसअप स्टेटस; अनिल देशमुख, धनंजय मुंडे, मुश्रिफांना अश्रू अनावर

Ajit Pawar Death News LIVE Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे शहरात शोककळा, आज आणि उद्या शहर बंद

Ajit Pawar Death: आता ‘दादा’ कुणाला म्हणायचं? अजित पवारांची संपूर्ण कारकीर्द… राजकीय प्रवासाचा थोडक्यात आढावा

'ही सकाळ सुन्न करणारी! राजकारणातल्या मोकळ्या ढाकळ्या नेत्याचं असं जाणं धक्कादायक'; अजितदादांच्या निधनानंतर महेश लांडगेंनी व्यक्त केलं दु:ख

SCROLL FOR NEXT