Nana Patole
Nana Patole Sakal
महाराष्ट्र

नाना पटोले तोंडघशी! 'तो' दावा भंडारा पोलिसांनी काढला खोडून

Amit Ujagare (अमित उजागरे)

भंडारा : मोदी नावाच्या गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नुकताच केला होता. पण आता त्यांच्यावर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. कारण त्यांचा हा दावा भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) खोडून काढला आहे. आम्ही मोदी नावाच्या कोणालाही अटक केलेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. (No one named Modi has been arrested Bhandara police explanation on Nana Patole claim)

पोलीस अधिकारी अरुण वाईकर म्हणाले, "सोळा तारखेच्या घटनेबाबत सोशल मीडियावर ज्या अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. चौकशीला आत्ता सुरुवात झालेली आहे. या चौकशीत जे काही निष्पण्ण होईल त्यावर पुढील कायदेशीर कारवाई होईल. याबाबत चौकशीचे निष्कर्ष नंतर कळवले जातील. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही, केवळ चौकशीला सुरुवात केली आहे"

अटकेबाबत नाना पटोलेंनी काय केला दावा?

नाना पटोले यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी मोदी नावाच्या व्यक्तीबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. यावरुन त्यांनी पंतप्रधान मोदींबाबतच आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा करत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर टीका-टिपण्णी सुरु झाली. यानंतर यावर स्पष्टीकरण देताना पटोले यांनी सांगितलं होतं की, "या मोदी नावाच्या व्यक्तीला भंडारा पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. संबंधित व्यक्ती गुंड असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत"

"मोदी नावाच्या व्यक्तीला मी मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो" असं वक्तव्य पटोले यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला आणि माध्यमांना प्रतिक्रिया नाना म्हणाले, "मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते, त्याचं नाव मोदी आहे. तुम्हाला कोणता मोदी म्हणायचा आहे?" असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला होता. पटोलेंच्या या विधानावर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी कठोर शब्दात टीकास्त्र सोडलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT