cash sakal
महाराष्ट्र बातम्या

नो पार्किंगचा दंड 500 रुपये! सोलापूर शहरात नाही पार्किंग, दरवर्षी सोलापूरकर भरतात 1 कोटी रुपये ‘नो पार्किंग’चा दंड, नूतन महापौरांकडून अपेक्षा, वाचा...

सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी वाहन लावल्यास वाहतूक पोलिसांकडून त्या वाहनाला ५०० रुपयांचा दंड केला जातो. सोलापूर शहरात पार्किंगची सोय नसल्याने दरवर्षी सुमारे १८ ते २० हजार वाहनधारक ‘नो पार्किंग’चा दंड भरतात, अशी माहिती समोर आली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी वाहन लावल्यास वाहतूक पोलिसांकडून त्या वाहनाला ५०० रुपयांचा दंड केला जातो. सोलापूर शहरात पार्किंगची सोय नसल्याने दरवर्षी सुमारे १८ ते २० हजार वाहनधारक ‘नो पार्किंग’चा दंड भरतात, अशी माहिती समोर आली आहे.

सोलापूर शहरात नवीपेठ, टिळक चौक, मधला मारुती, सराफ बाजार येथे दररोज ग्राहकांची मोठी वर्दळ असते. पण, ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची मुख्य बाजारपेठांमध्ये सोय नाही. दुसरीकडे शहरातील सर्व रस्त्यांलगत चहा, नाष्टा सेंटर, पानटपऱ्या, हॉटेलसह अन्य व्यावसायिकांची छोटी-मोठी दुकाने आहेत. त्याठिकाणी देखील पार्किंगची सोय नसल्याने नेहमीच वाहने रस्त्यांवर थांबलेली दिसतात.

तसेच अनेक अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या जागेत अगाऊ बांधकाम झाल्याने काही घरमालकांची वाहने देखील रस्त्यांलगतच दिसतात. त्या वाहनांना ‘नो पार्किंग’चे ई- चालान टाकले जाते. सोलापूर शहरात महापालिकेकडून पार्किंगची सोय केली नसल्याने वाहनधारकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यांची दंडातून मुक्तता होण्यासाठी स्मार्ट सिटीत पार्किंगची कायमची सोय करावी लागणार आहे. जेणेकरून शहरातील दुकानांमध्ये विविध वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या वाहनधारकांची नो पार्किंगच्या दंडातून सुटका होणार आहे.

नो पार्किंगचा दंड ५०० रुपये

सोलापूर शहरातील मधला मारुती परिसर, सराफ बाजार अशा परिसरात वाहनांच्या पार्किंगची सोय आवश्यक आहे. तेथील विक्रेत्यांची तशी मागणी असून त्यानुसार आम्ही महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. ७० फूट भाजी मंडई, विजयपूर रोड भाजी मंडईमुळे देखील वाहतुकीस अडथळा होतो. नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने लावल्यास त्यांना ५०० रुपयांचा दंड होतो.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

नूतन पदाधिकाऱ्यांकडून सोलापूरकरांना अपेक्षा

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सोलापूर शहरात एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. पण, पार्किंगची सोय करण्यात आली नाही. महापालिकेच्या वतीने देखील शहरात पुरेशा प्रमाणात पार्किंगची सोय केलेली नाही. सोलापूर शहरातील बाजारपेठांमध्ये दररोज हजारो वाहने विविध कामानिमित्त येतात. पण, पार्किंगची सोय नसल्याने वाहनधारकांना रस्त्यांलगतच वाहने उभी करावी लागतात. वाहतुकीला अडथळा होत असल्याने त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकाऱ्यांनी शहरात पार्किंगची सोय करावी, अशी अपेक्षा सोलापूर शहर-जिल्ह्यातील वाहनधारकांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT