ratioan-grain 
महाराष्ट्र बातम्या

रेशन दुकानात धान्य नाही; गरीबांची परवड सुरू 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - गरजूंना तीन महिन्याचे धान्य मिळेल अशी घोषणा सरकारने केली असली तरी प्रत्यक्षात रेशन दुकानात साठाच उपलब्ध नाही. मजुरी बंद झालेल्या गरिबांनी घरात धान्य यावे यासाठी रेशन दुकानात रांग लावली तरी प्रत्यक्षात तेथे काहीही उपलब्ध नाही.केंद्र सरकारने तीन महिन्याचे राशन मिळेल अशी घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने काल ता.29 रोजी धान्य उपलब्ध होईल असा जीआर काढला पण दुकानात ठणठणाट आहे.

गोदामातून दुकानापर्यंत धान्य पोहोचवणारे लोडर्स,वाहनचालक गावाकडे निघून गेल्याने टंचाई जाणवते आही की धान्यच नाही असा प्रश्‍न आता भेडसावतो आहे. 

आधार कार्ड नसेल त्यांनी फॉर्म भरून दयावेत ,विवक्षित नमुन्यात ते भरले असल्यास धान्य मिळेल असेआज सकाळपासून समाजमाध्यमांवर फिरत होते.ते सर्वत्र पसरवण्यास नगरसेवक आमदारांनीही सुरूवात केली मात्र संयाकाळी उशीरा अशा प्रकारचा कोणताही आदेश निघालेला नाही असे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठाविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

आज प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण आणि पराग अळवणी यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना पत्र पाठवून रेशन दुकानात लवकरात लवकर साठे उपलब्ध करून दया असे पत्राव्दारे कळवले आहे.अळवणी यांनी पत्रात गरजूंना डाळ तांदूळ मोफत दयावेत अशी विनंती केली असून लवकरात लवकर दुकानात माल पोहाचवावा अशी विनंती केली आहे.राज्य सरकारने 30 टक्‍के दुकानात माल पोहोचला आहे, तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार धान्य वितरीत केले जाईल असे कळवण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT