शिक्षक Google
महाराष्ट्र बातम्या

यंदा शिक्षकांच्या बदल्या नाहीत! जिल्हा परिषद शाळांवरील शिक्षकांच्या बदल्या आता पुढच्यावर्षी; जनगणनेचे काम केलेल्या शिक्षकांना मिळणार विशेष रजा

यंदा शिक्षकांना ऐन उन्हाळा सुट्ट्यांमध्ये जनगणनेचे काम करावे लागले. १६ मे ते १६ जूनपर्यंत घरगणनेचे काम त्यांना दिले होते. या कामासाठी नियुक्त शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. शाळा सुरु होण्यापूर्वी म्हणजे मेअखेर शिक्षकांच्या बदल्या अपेक्षित होत्या. आता पुढच्या आठवड्यापासून शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे यंदा शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या होणार नाहीत, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : यंदा शिक्षकांना ऐन उन्हाळा सुट्ट्यांमध्ये जनगणनेचे काम करावे लागले. १६ मे ते १६ जूनपर्यंत घरगणनेचे काम त्यांना दिले होते. या कामासाठी नियुक्त शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. शाळा सुरु होण्यापूर्वी म्हणजे मेअखेर शिक्षकांच्या बदल्या अपेक्षित होत्या. आता पुढच्या आठवड्यापासून शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे यंदा शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या होणार नाहीत, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शाळांवरील ज्या शिक्षकास एकाच शाळेत पाच वर्षे पूर्ण होतात, त्यांची दरवर्षी दुसऱ्या शाळांमध्ये समायोजनाद्वारे बदली होते. तर आंतरजिल्हा बदलीसाठी त्याच जिल्ह्यात १० वर्षे सेवेची अट आहे. यंदा १५ वर्षांनंतर जनगणना होत असल्याने शिक्षकांना उन्हाळा सुट्टीतच ते काम करावे लागले. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिक्षक भरती देखील थांबली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची १० हजारांवर पदे रिक्त आहेत. अशातच शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांच्या बदल्या शक्य नाहीत. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी स्वतःच्या मुलांच्या शाळेचीही व्यवस्था केलेली असते. त्यामुळे आता जूनमध्ये आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत बदल्या केल्यास शिक्षकांच्या कुटुंबाचीही अडचण होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांवरील शिक्षकांच्या बदल्या पुढच्याच वर्षी होतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यात विनंती, पतिपत्नी एकत्रिकरण, दिव्यांग शिक्षक व अन्य शिक्षकांच्या बदल्यांचाही समावेश आहे.

आता पुढच्या वर्षीच होतील बदल्या

मे-जूनमध्ये शिक्षकांना जनगणनेचे काम होते, त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया होऊ शकली नाही. दरवर्षी मे-जूनमध्येच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या होतात, पण यंदा त्या झाल्या नाहीत. त्यामुळे आता पुढच्या वर्षीच बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या होतील.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

‘त्या’ शिक्षकांना मिळणार विशेष रजा

केंद्र सरकारच्या माध्यमातून या वर्षी जनगणनेच्या कामाला सुरवात झाली आहे. मे महिन्यात घरोघरी जाऊन शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबांची माहिती संकलित करून जिल्हा प्रशासनाला सादर केली. १५ जूनपासून आता शाळा सुरु होणार आहेत. मात्र, जनगणनेच्या कामासाठी नियुक्त शिक्षकांना शासनाच्या मान्यतेने सुट्टीच्या दिवसांत काम केल्याबद्दल तेवढ्या दिवसांची विशेष रजा मिळते, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर झेडपी शाळांची स्थिती

  • एकूण शाळा

  • २,७६८

  • कार्यरत शिक्षक

  • ८,६००

  • आंतरजिल्हा बदलीस पात्र

  • १,७३९

  • यंदा शिक्षकांच्या बदल्या

  • ०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: महायुतीचे नेते अभिजीत दीपकेंचे फॅन; भेटीसाठी गर्दी, आंदोलनाच्या भूमिकेचे कौतुक करत सुरक्षेचीही मागणी

Latest Marathi News Live Update : बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणासह महेश या तिन्ही नद्यांना मोठा पूर; धोक्याची पातळी ओलांडली

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT