CIDCO Home sakal media
महाराष्ट्र बातम्या

CIDCO Homes: सिडकोची घरं विकताना आता NOC ची गरज नाही! बोर्ड मिटिंगमध्ये 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाला निर्णय

मुंबई येथील मुख्यालयात सिडकोची बोर्ड मिटिंग पार पडली. यानंतर सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी बैठकीत नेमके काय निर्णय झाले याची माहिती दिली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : सीटी अँड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. (CIDCO) अर्थात सिडकोची बोर्ड मिटिंग नुकतीच पार पडली. यावेळी सिडकोच्या नव्या लॉटरीसह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सिडकोची घरं विकताना एनओसीची गरज भासणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला. मुंबई येथील मुख्यालयात सिडकोची बोर्ड मिटिंग पार पडली. यानंतर सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी बैठकीत नेमके काय निर्णय झाले याची माहिती दिली.

नेमके काय झाले निर्णय?

१) सिडकोच्या घरांवरील लीज होल्ड करता येणार

२) तसंच सिडकोची घरं फ्री होल्ड करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

३) त्याचबरोबर सिडकोची घरं विकताना सिडकोच्या एनओसी गरज नाही.

४) तसंच ही घरं विकतना पैसे लागत होते पण आता ते ही द्यावे लागणार नाहीत.

४) १०० मीटरच्यावर जी घरं असतील त्यांच्याकडून नाममात्र शुल्क आकारलं जाणार आहे.

५) नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नाशिक आणि नागपूर या शहरांत जी सिडकोची घरं आहेत तिथं या निर्णयाचा लोकांना फायदा होणार आहे.

सिडकोची निघणार लॉटरी

त्याचबरोबर सिडकोच्या घरांसाठी फ्रेश लॉटरी काढण्यात येणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्या २६ हजार घरांची लॉटरी निघणार आहे. नवी मुंबईत घरं घेणाऱ्यांसाठी हे महत्वाचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT