raj thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट; नेमकं प्रकरण काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीस उपस्थित राहिल्याने राज ठाकरे यांना सांगलीच्या शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे.

रेल्वे आंदोलनादरम्यान राज ठाकरे यांना २००९ मध्ये अटक करण्यात आलेली होती. त्या अटकेच्या निषेधार्थ सांगलीतल्या शिराळा तालुक्यातील शेगवेवाडी येथे आंदोलन करण्यात आलेलं होतं.

मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं होतं. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज ठाकरे, तानाजी सावंत यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.

हा खटला १४ वर्षांपासून सुरु आहे. सुनावणीसाठी राज ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. वारंवार ते गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट बजावण्यात आलं होतं. हे वॉरंट इस्लामपूर न्यायालयामधून रद्द करुन घेण्यात आलं होतं.

राज ठाकरे यांच्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे आणि शिरीष पारकर हे बाहेरगावी असल्याने त्यांना सुनावणीमध्ये सूट देण्यात यावी, असा अर्ज करण्यात आलेला होता. मात्र कोर्टाने अर्ज फेटाळून लावत राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणींमध्ये वाढ होणार, असं दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT