Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; अजामीनपत्र वॉरंट जारी; काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी २४ जानेवारीला होणार आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊतांविरोधात मानहानीचा आरोप करत थेट कोर्टात खटला दाखल केला होता. (Non bailable warrant issued against Sanjay Raut Kirit Somaiya wife Medha Somayya)

दोन दिवसांपूर्वी, भाजप नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांनी पुन्हा जेलवारी घडवणार असं विधान केलं होतं. अशातच आज राऊतांविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे.

मेधा सोमय्या यांनी कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊतांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

संजय राऊत यांनी शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात शिवडी कोर्टात मानहानीचा दावा केला आहे. राऊत हे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश ईडीला द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती.

मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात हा काही कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असल्याचा दावा राऊतांनी केला. सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा केला. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा केल्याचा दावा राऊतांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

Wai Bhuinj Police Action: भुईंज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरणारी ‘पिकअप गँग’ जेरबंद, सहा जनावरांच्या चोरीची कबुली

SCROLL FOR NEXT