Solapur ZP

 
Sakal
महाराष्ट्र बातम्या

६५ वर्षांत एकदाही नाही सोलापूर झेडपीचा अध्यक्ष भाजपचा! आता मुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास मंत्री गोरेंनी आखली रणनिती; ५ माजी आमदार भाजपमध्ये जाणार, तरीपण...

१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर सोलापूर स्वतंत्र जिल्हा बनला. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर सोलापूर स्वतंत्र जिल्हा बनला. जिल्हा परिषदेची स्थापना ग्रामविकास विभागाच्या स्थापनेनंतर म्हणजेच १ मे १९६० रोजी झाली. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच यश मिळाले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसेचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचीही ताकद आहे. भाजप-शिवसेना एकत्रित असतानाही १९६० पासून भाजपला सोलापूर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविता आली नाही. २०१४ नंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली. सध्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, पंढरपूर-मंगळवेढा येथे भाजपचे आमदार आहेत. तरीपण, जिल्हा परिषदेवर सत्ता अशक्य असल्याने विरोधी पक्षातील माजी आमदारांना (ज्या तालुक्यात आतापर्यंत भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळाले नाही असे) सोबत घेण्याचा डाव भाजपने आखला आहे.

सोलापूर जिल्ह्याची रचना १८७१ मध्ये सातारा जिल्ह्याचा काही भाग समावेश करून करण्यात आली. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर सोलापूर स्वतंत्र जिल्हा बनला. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर सोलापूर स्वतंत्र जिल्हा बनला. जिल्हा परिषदेची स्थापना ग्रामविकास विभागाच्या स्थापनेनंतर म्हणजेच १ मे १९६० रोजी झाली. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच यश मिळाले. आता माढा व सांगोल्यातील प्रत्येकी सात, दक्षिण सोलापूर व मोहोळमधील प्रत्येकी सहा आणि अक्कलकोटमधील सहा, पंढरपुरातील आठ, मंगळवेढ्यातील चार आणि माळशिरसमधील सर्वाधिक नऊ सदस्य निवडून आल्यास भाजपची एकहाती सत्ता शक्य आहे. पण, सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे.

सांगोला व अक्कलकोट तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत. दुसरीकडे माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, माळशिरसमध्ये विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनाही आपली ताकद, राजकीय अस्तित्व या निवडणुकीत दाखवावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांचा सोलापुरातील माजी आमदारांच्या पक्षांतराचा डाव यशस्वी होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मागच्या पालकमंत्र्यांचा दोस्तीचा तर गोरेंचा थेट पक्षांतराचा डाव

२०१७ मधील झेडपी निवडणुकीवेळी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रत्येक जिल्ह्यातील समविचारी नेत्यांची मोट बांधली. राजेंद्र राऊत, संजयमामा शिंदे, सुरेश हसापुरे, विजय डोंगरे, अशा नेत्यांना सोबत घेतले आणि डाव यशस्वी केला. पण, भाजपच्या चिन्हावरील अध्यक्ष होऊ शकला नाही. अपक्ष सदस्य संजयमामा यांना सर्वानुमते अध्यक्ष करण्यात आले. सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच व्हावा, यासाठी मोहोळ (राजन पाटील, यशवंत माने), सांगोला (दिपक साळुंखे), दक्षिण सोलापूर (दिलीप माने), माढा (बबनराव शिंदे) या माजी आमदारांना थेट पक्षातच घेण्याचे नियोजन केले आहे. या निवडणुकीत भाजपने काही तालुक्यात मित्रपक्षाला जरी सोबत घेतले, तरी भाजप हा बहुमताचा (३५ जागा) आकडा पार करेल, यादृष्टीनेच पालकमंत्री श्री. गोरे यांचे नियोजन असणार आहे.

तालुकानिहाय झेडपी गट...

  • तालुका गट

  • करमाळा ६

  • माढा ७

  • बार्शी ६

  • उ. सोलापूर ३

  • मोहोळ ६

  • पंढरपूर ८

  • माळशिरस ९

  • सांगोला ७

  • मंगळवेढा ४

  • द.सोलापूर ६

  • अक्कलकोट ६

  • एकूण ६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT