sameer wankhede esakal
महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडेंना दिलासा नाही; 'तो' विनंती अर्ज कोर्टानं फेटाळला

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : क्रूझ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याच या प्रकरणाला वेगळं वळण देणारं प्रतिज्ञापत्र व्हायरल झालं आहे. या प्रकरणाची आधीच कोर्टात सुनावणी सुरु असल्यानं या प्रतिज्ञापत्राची कुठल्याही कोर्टानं दखल घेऊ नये, असा आदेश देण्याचा विनंती अर्ज एनसीबीच्यावतीनं झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी विशेष NDPS कोर्टात दाखल केला होता. पण ही बाब कोर्टाच्या अधिकाराबाहेरची सल्यानं असा दिलासा देता येणार नाही, असं सांगत कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे वानखेडे यांच्यासाठी हा झटका मानला जात आहे.

विशेष NDPS कोर्टानं समीर वानखेडे यांचा अर्ज फेटाळताना म्हटलं की, हे प्रकरण आधीच आरोपींच्या जमीनासंदर्भात हायकोर्टात पोहोचलं आहे. त्यामुळं यासंदर्भात नेमके निर्देश मिळवण्यासाठी एनसीबीनं हायकोर्टात जायला हवं, असंही NDPS कोर्टानं NCB ला सांगितलं.

समीर वानखेडे अर्जात नक्की काय म्हणाले?

समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईलच्या व्हायरल प्रतिज्ञापत्राविरोधात विशेष NDPS कोर्टात धाव घेत प्रतिज्ञापत्र सादर केलं तसंच एनसीबीच्यावतीनंही एक विनंती अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला. कॅडेलिया क्रूझ पार्टी प्रकरणी कोर्टाबाहेर आरोप केले जात असून पंच आणि साक्षीदारांची नावे उघड केली जात आहेत. यामुळे याच्या तपासावर आणि खटल्यावर परिणाम होऊ नये अशी भीती ही त्यांनी व्यक्त केली आहे.

साईलच्या कथित प्रतिज्ञापत्रावरुन समीर वानखेडे आणि एनसीबीच्या तपासाबाबत पूर्वग्रह निर्माण केला जात आहे. ही कागदपत्रे कोर्टात सादर न करता माध्यमांमध्ये सादर केली जात असल्यानं आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचंही वानखेडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच या व्हायरल प्रतिज्ञापत्राची कोणत्याही कोर्टानं दखल घेऊ नये, असे आदेश कोर्टाने द्यावेत अशी विनंती एनसीबीनं आपल्या अर्जातून NDPS कोर्टाकडे केली होती. पण कोर्टाने हा विनंती अर्ज फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता सिद्धांत कपूर याच्या विरोधातील एफआयआर रद्द केला

Kasari Sonarmala Road: कासारीतील सोनारमळा रस्ता वर्षानुवर्षे दुरावस्थेत; ग्रामस्थांचा ‘रस्ता देता का’ असा आक्रोश

Devotional Food Service: आषाढी वारीत गायकवाड कुटुंबीयांचा अन्नदान उपक्रम; सलग पाच वर्षे वारकऱ्यांची आपुलकीने सेवा

Loni Kalbhor drugs crackdown : लोणी काळभोर पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात सलग धडक कारवाई; गांजा सेवन करणारे सात जण रंगेहात जेरबंद

SCROLL FOR NEXT