Navneet Rana e sakal
महाराष्ट्र बातम्या

नवनीत राणांनी केले आक्षेपार्ह संभाषण; महिला आयोगाने बजावली नोटीस

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पत्नी आणी १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत घरठाव केला. महिलेने तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता खासदार नवनीत राणा यांनी तिच्यासोबत आक्षेपार्ह भाषेत संभाषण केले. यासंदर्भात महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. यानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले. (Notice issued by the Women's Commission To Navneet Rana)

अमरावती जिल्ह्यातील महिलेची तक्रार राज्य महिला आयोगाला १७ जानेवारी रोजी प्राप्त झाली होती. तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पतीने आपल्याला अंधारात ठेवून दुसरा विवाह केला आणि १८ महिन्यांच्या मुलीला वाऱ्यावर सोडले, असा आरोप महिलेने केला होता. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हा पदाधिकारी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे. राणा यांनी महिलेची तक्रार ऐकून न घेता आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

महिलेने नवनीत राणा यांना फोन केला असता नंबर ब्लॉक करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून खासदार राणा यांना फोन केला असता, त्यांनी आक्षेपार्ह भाषेत महिलेशी संवाद साधला. खासदार राणा यांनी जे संभाषण केले, ते अतिशय अश्लील होते आणि ते मानहानी करणारे होते अशी तक्रार महिलेने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. तसेच नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे.

नवनीत राणा नोटीसला काय उत्तर देतात?

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी तक्रार ऐकूनही घेतली नाही आणि आरोपीला पाठीशी घातले. परंतु, महिलेने हार न मानता राज्य महिला आयोगाचा दरवाजा ठोठावला. आता नवनीत राणा नोटीसला काय उत्तर देतात? हे प्रकरण काय वळण घेते? याकडे अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT