Chandrashekhar Bawankule 
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule: 'छोटे पक्ष संपवा..' बातमी देणाऱ्या पत्रकारांना नोटीस पाठवणार; बावनकुळे आक्रमक

छोटे पक्ष संपवा अशा आशयाचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याच्या बातम्या काही माध्यमांनी लावल्या होत्या

कार्तिक पुजारी

मुंबई- छोटे पक्ष संपवा अशा आशयाचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केल्याच्या बातम्या काही माध्यमांनी लावल्या होत्या . यावरुन बावनकुळे यांच्यावर टीका केली जात होती. विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं. वाद वाढत असल्याचं पाहून बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आम्ही लहान पक्षांना घेऊन काम करतो. त्यांना सोबत घेतो. उलट शरद पवार लहान पक्षांना संपवतात. आम्ही लहान पक्षांचा सन्मान करतो. विरोधकांना काही कामं राहिलेली नाहीत. ज्या पत्रकारांनी खोटी बातमी छापली आहे, त्यांना मी नोटीस देणार आहे, असा स्पष्ट इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

मी असं म्हटलं की, विकसित भारताचा संकल्प मोदींनी केला आहे. या संकल्पाला साथ देण्यासाठी पक्ष प्रवेश होत आहेत. २७ तारखेलाही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत. मी असं म्हणालो प्रत्येक बुथवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होत आहेत. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास तयार आहेत, असं ते म्हणाले.

जे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. त्यांना पक्षामध्ये घ्या. ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांना पक्षात घ्या, असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं. नव्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या. जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करा. छोट्या पक्षांचा आम्ही कायम सन्मान केला आहे, असं बावनकुळे म्हणाले.

अटल बिहारी वाजपेयी यांनी इतक्या पक्षाचं सरकार चालवलं. मोदींनी बहुमत असताना घटक पक्षांना सोबत घेतलं. महाराष्ट्रात देखील सर्वांना सोबत घेतलं. भाजप हा छोट्या पक्षांना सांभाळणारा पक्ष आहे. काँग्रेससारखा हा पक्ष नाही. छोट्या पक्षांचा सन्मान भाजपमध्ये होतो. पक्षाची उंची वाढवणे माझी जबाबदारी आहे. पक्षात खूप जागा आहे, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT