solapur univercity sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठाशी संलग्नित आता ११४ महाविद्यालये! सोलापुरातील विडी घरकूल परिसरात कोठेंचे नवीन लॉ कॉलेज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पाच नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य शासनाने कायम विनाअनुदान तत्त्वावर अंतिम मान्यता दिल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी दिली.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांचे पाच नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कायम विनाअनुदान तत्त्वावर अंतिम मान्यता दिल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत यांनी दिली. यापूर्वी विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालये होती. आता त्यात पाच नवीन महाविद्यालयांची भर पडली आहे.

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ जून रोजी शासन आदेश काढून संपूर्ण राज्यांमध्ये ४९ नवीन महाविद्यालये सुरू करण्यास अंतिम मान्यता दिली आहे. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत पाच महाविद्यालयांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार शहर व जिल्ह्यातील पात्र संस्थांकडून प्रस्ताव व अहवाल मागवून, त्याची पडताळणी करून शासनाकडे मान्यतेसाठी त्या महाविद्यालयांचे प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अटी व शर्तीच्या अधीन राहून कायम विनाअनुदान तत्त्वावर या नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्याठिकाणी यंदापासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.

यंदा ‘ही’ पाच महाविद्यालये सुरु होणार

नवीन पाच महाविद्यालयांमध्ये कण्हेरसिद्ध बहुउद्देशीय संस्थेचे शिवशंभू महाविद्यालय, कण्हेर, ता. माळशिरस यांच्या महाविद्यालयात यंदाच्या वर्षीपासून बीए आणि बीएस्सी अभ्यासक्रम सुरु होणार आहे.

बाल जागृती विकास मंडळाचे कै. गणेशकाका कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय, माढातर्फे बीएस्सी अभ्यासक्रम तर महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशन रिसर्चचे एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बार्शी हे देखील नव्याने सुरु होणार आहे. संभाजीराव शिंदे विद्यामंदिराचे स्व. विष्णुपंत कोठे (तात्यासाहेब) विधी महाविद्यालय विडी घरकुल सोलापूर येथे बी.ए.एल.बी., एल.एल.बी. आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सौ. प्रेमाताई पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौडगाव, ता. बार्शीचा देखील त्यात समावेश आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह विद्यापीठातील इतर अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून या नवीन महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Forest Land: राज्य सरकारचा निर्णय! वनजमिनींच्या नोंदी अद्ययावत होणार, प्रकल्पांना मिळणार गती, जिल्हाधिकाऱ्यांना काय दिले आदेश..

Parbhani News: केशर १२०, दशहरी १००, कर्नाटकी हापूस १५० रुपये किलो;परभणीच्या फळबाजारात आंब्याच्या दरात घसरण; सर्वसामान्यांना दिलासा

नेस्को प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्यांच्या कोठडीत वाढ, एक्स्टॅसी पुरवणाऱ्या मुख्य आरोपीसमोर होणार चौकशी

Latest Marathi News Live Update : मुरबाड माळशेज महामार्गावर भीषण अपघात

Gokul Dudh Sangh Politics : 'गोकुळ'वर प्रशासक राज किती काळ? 63 वर्षांच्या इतिहासातील पहिल्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ, काय सांगतो नियम?

SCROLL FOR NEXT