solapur city

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

आता नागरिकांना घरी बसून देता येणार पोलिसांत तक्रार! सोलापूर शहर पोलिसांच्या संकेतस्थळावर मुली, महिलांना सुरक्षेच्या टिप्स; पोलिस आयुक्तांचा पुढाकार, वाचा...

सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी नागरिकांसाठी पोलिसांच्या वेबसाईटचे नुतनीकरण केले आहे. त्यावर इंग्रजी व मराठीतून माहिती उपलब्ध असणार आहे. त्यातील सिटीजन पोर्टल लिंकवरून नागरिकांना सोलापूरसह राज्यभरात कोठेही ऑनलाइन तक्रार करता येणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी नागरिकांसाठी पोलिसांच्या वेबसाईटचे नुतनीकरण केले आहे. त्यावर इंग्रजी व मराठीतून माहिती उपलब्ध असणार आहे. त्यातील सिटीजन पोर्टल लिंकवरून नागरिकांना सोलापूरसह राज्यभरात कोठेही ऑनलाइन तक्रार करता येणार आहे. तसेच संकेतस्थळावर शहर नियंत्रण कक्षाचे व्हॉट्‌सॲप नंबर व क्युआर कोड दिले असून त्यावरून नागरिकांना तक्रार किंवा सूचना करता येणार आहेत. त्याचे लोकार्पण पोलिस आयुक्तांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

सोलापूर शहर पोलिसांच्या संकेतस्थळाचे नुतनीकरण सर्वसामान्य नागरिकांची सोय होईल, असे करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, विजय कबाडे, गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, ‘सायबर’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. नुतनीकरणासाठी पोलिस उपनिरीक्षक प्रविण भोपळे, नागेश इंगळे, पोलिस अंमलदार रतिकांत राजमाने, इब्राहिम शेख यांच्यासह पॉवर टेक्नालॉजीचे पंकज चव्हाण व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले आहे. आता हे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले असणार आहे.

संकेतस्थळाबाबत ठळक बाबी...

  • नागरिक, गहाळ झालेले व सापडलेल्या वस्तूंची माहिती संकेतस्थळावर देता येणार आहे.

  • फरार व पाहिजे आरोपींचीही माहिती संकेतस्थळावर असणार आहे.

  • सायबर सुरक्षा, पोलिस भरती, नागरिकांसाठी माहिती अधिकार, पोलिसांचे उपक्रम याचीही असणार माहिती.

  • महिला व नागरिकांच्या सुरक्षेविषयक व सावध राहण्यासंदर्भातील टिप्स देखील संकेतस्थळावर आहेत.

  • सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर, पोलिस ठाण्यांचे लोकेशन देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापुरात MH 09 वगळता इतर वाहनांसाठी 'प्रवेश कर', महापालिकेचा निर्णय तुघलकी; विरोधकांचा संताप

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

दोर बांधायला विसरले, बंजी जंपिंगवेळी निष्काळजीपणा; २१ वर्षीय तरुणीला तशीच फेकली, जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

SCROLL FOR NEXT