mantralya-mumbai 
महाराष्ट्र बातम्या

आता महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस ठाणे

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महिलांना त्यांच्यावरील अत्याचाराची तक्रार पोलिस ठाण्यात येऊन नोंदविता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याबाबत गृह विभाग प्रयत्न करणार आहे.

राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून, गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी, असा आदेश त्यांनी गृह विभागास दिला आहे. महिला अत्याचाराच्या घटनेत न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर त्याचा निकाल लागण्यास विलंब लागतो. यात न्यायासाठी झगडणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास डळमळायला लागतो. गुन्हेगारांवर वेळीच कारवाई होऊन त्यांच्यावर जरब बसावी यासाठी महिला अत्याचाराची प्रकरणे लवकर निकाली लागण्यासाठी राज्य सरकार द्रुतगती न्यायालय, विशेष न्यायालयांची स्थापना यांसारख्या गोष्टी प्राधान्याने हाती घेणार आहे. राज्य महिला आयोगाचे सक्षमीकरण हाही त्यातील एक महत्त्वाचा विषय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT