solapur univercity

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कामकाज नव्या प्रशासकीय भवनातून; विद्यार्थ्यांना ये-जा करायला दोन बसगाड्या, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कामकाज आता ६० कोटी रुपयांच्या नव्या प्रशासकीय भवनातून चालणार आहे. सध्याच्या इमारतीतील परीक्षा विभाग, प्रशासन, वित्त व लेखा विभाग, ॲडमिन असे विभाग या नव्या इमारतीत असणार आहेत. याशिवाय कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रशस्त दालने नव्या इमारतीत करण्यात आली आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कामकाज आता ६० कोटी रुपयांच्या नव्या प्रशासकीय भवनातून चालणार आहे. सध्याच्या इमारतीतील परीक्षा विभाग, प्रशासन, वित्त व लेखा विभाग, ॲडमिन असे विभाग या नव्या इमारतीत असणार आहेत. याशिवाय कुलगुरू, प्र कुलगुरू, कुलसचिव यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रशस्त दालने नव्या इमारतीत करण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यापीठासंबंधी कामासाठी विद्यार्थ्यांसह सर्वांना आता हिरज रोडवरील नव्या प्रशासकीय भवनात जावे लागणार आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे सोलापूरसाठी एक केंद्र होते. १ ऑगस्ट २००४ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हापासून विद्यापीठाचे कामकाज जुन्याच इमारतीतून चालत होते. राज्य शासनाच्या माध्यमातून निधी प्राप्त झाल्यावर हिरज रोडवरील विद्यापीठाच्या जागेत नवीन भव्य प्रशासकीय इमारत उभारली आहे. त्यात सगळेच विभाग असणार आहेत, पण लायब्ररी (ग्रंथालय) जुन्याच इमारतीत सुरू राहणार आहे. पहिला मजला ग्रंथालयासाठी असणार आहे. त्यासाठी स्वतंत्र लिफ्ट देखील बांधली जात आहे.

याशिवाय विद्यापीठाच्या आवारातील १५ संकुले देखील आहे तेथेच असतील. नवीन प्रशासकीय इमारतीत कामकाज सुरू झाल्यावर दरमहा लाखांचे वीजबिल येईल. या पार्श्वभूमीवर नवीन प्रशासकीय इमारतीवर सोलार पॅनेल उभारले जाणार असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड देखील केली जात आहे. नवीन इमारतीत परीक्षा विभागाचे कामकाज योग्य पद्धतीने चालेल, त्या ठिकाणी नियंत्रण कक्ष देखील उभारला जाणार असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

इमारतीसमोर १५२ फुटांचा वॉच टॉवर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नव्या प्रशासकीय भवनासमोर मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर तब्बल १५२ फूट उंचीचा (४८ मीटर) वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. त्याच परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे १४ कोटी ८२ लाखांचे स्मारक उभारले आहे. तसेच तेथेच २० कोटींचे इनडोअर स्टेडियमही उभारले आहे.

प्रवासासाठी दोन बसगाड्या

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाचे सर्व प्रशासकीय कामकाज नवीन प्रशासकीय इमारतीत सुरू होणार आहे. या ठिकाणी सोलार पॅनेल उभारले जाणार असून, सध्या फर्निचरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यार्थ्यांसह विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना नवीन प्रशासकीय इमारतीकडे ये-जा करण्यासाठी प्रिसिजन व बालाजी अमाईन्स या कंपन्यांनी दिलेल्या बसगाड्यांचा वापर केला जाणार आहे.

- डॉ. अतुल लकडे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

Maharashtra Drought Relief : दुष्काळी मदतीसाठी 'ई-पीक पाहणी' ठरणार जाचक? अट शिथिल करण्याची गरज; राज्यात 35.37 टक्के गटांची पाहणी

Marathi News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीतील 'बारापुल्ला फेज-३' कॉरिडॉरचे उद्घाटन

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

SCROLL FOR NEXT