Punyashlok Ajilyadevi Holkar solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

परीक्षेनंतर आता २० दिवसांतच निकाल! प्राध्यापकांना मोबाईलवरही तपासता येणार उत्तरपत्रिका; विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियोजन

प्रत्येक अभ्यासक्रमाचा निकाल अवघ्या २० दिवसांतच जाहीर होईल, असे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑनस्क्रिन तपासले जातात. त्या लॉगिन आयडीवरून प्राध्यापकांना घरबसल्या मोबाईलवरूनही पेपर तपासता येणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पहिल्याच सत्राची परीक्षा युवा महोत्सवामुळे लांबली. आता २८ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली आहे. पुढील सत्र वेळेत सुरू व्हावे, असे नियोजन विद्यापीठाने केले आहे. त्यासाठी प्रत्येक अभ्यासक्रमाचा निकाल अवघ्या २० दिवसांतच जाहीर होईल, असे नियोजन विद्यापीठाने केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑनस्क्रिन तपासले जातात. त्या लॉगिन आयडीवरून प्राध्यापकांना घरबसल्या मोबाईलवरूनही पेपर तपासता येणार आहेत.

विद्यापीठाशी संलग्नित १०८ महाविद्यालये आहेत. सध्या सुरू असलेल्या सत्र परीक्षेसाठी सुमारे ७२ हजार विद्यार्थी आहेत. पेपर तपासणीसाठी विलंब होऊ नये म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑनस्क्रीन तपासले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक प्राध्यापकास लॉगइन आयडी देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना संगणक, लॅपटॉप आणि त्यांच्या मोबाईलवरही उत्तरपत्रिका तपासायची सोय उपलब्ध झाली आहे.

उत्तरपत्रिका तपासणीसाठी २००० प्राध्यापक आहेत. त्यांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख उत्तरपत्रिका तपासल्या जातील. त्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे व एलएलबी, बीएड आणि एमपीएड या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे निकाल डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत लागतील, असेही सांगण्यात आले. त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया उशिरा झाली होती.

निकाल वेळेतच जाहीर होतील

२८ ऑक्टोबरपासून विद्यापीठाची सत्र परीक्षा सुरू झाली आहे. पेपर झाल्यानंतर लगेचच त्याची तपासणी सुरू आहे. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल २० दिवसांतच जाहीर होईल, असे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट ऑनलाइन, निकाल ऑनलाइन, प्रश्नपत्रिकाही संबंधित परीक्षा केंद्रांना ऑनलाइन पाठविल्या जातात आणि पेपर तपासणी व निकालही ऑनलाइनच जाहीर होतो.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

तीन ठिकाणी पेपर तपासणी केंद्र

पारंपरिक अभ्यासक्रमांचे पेपर सध्यातरी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच प्राध्यापकांना तपासावे लागतात. त्यासाठी बार्शीतील शिवाजी महाविद्यालय, पंढरपुरातील उमा महाविद्यालय आणि सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयात त्याची केंद्रे करण्यात आली आहेत. त्या त्या विषयांच्या प्राध्यापकांना (विद्यापीठाने पेपर तपासणीसाठी नेमलेले) तेथे जाऊन उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. त्या ठिकाणी तपासल्या जाणाऱ्या पेपरची माहिती मिळावी म्हणून विद्यापीठात मध्यवर्ती कॅब तयार करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

SCROLL FOR NEXT