solapur-pune national higway

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

आता सोलापूर-पुणे महामार्ग सहापदरी? टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; फास्टॅग असतानाही वाहनधारकांना थांबावे लागते टोल नाक्यावर

टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत, इंधन बचत व्हावी, प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रत्येक वाहनासाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले. मात्र, अजूनही टोल नाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळतात. रविवारी (ता. २३) सावळेश्वर टोल नाक्यावर दोन्ही बाजूंनी सायंकाळी सातच्या सुमारास साधारणत: अर्धा किलोमीटर वाहनांची रांग होती.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत, इंधन बचत व्हावी, प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रत्येक वाहनासाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले. मात्र, अजूनही टोल नाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळतात. रविवारी (ता. २३) सावळेश्वर टोल नाक्यावर दोन्ही बाजूंनी सायंकाळी सातच्या सुमारास साधारणत: अर्धा किलोमीटर वाहनांची रांग होती.

सोलापूरहून पुण्याला जाताना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर येथे पहिलाच टोल नाका आहे. विजयपूरला जाण्यासाठी हत्तूर बायपास झाल्याने सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. या वाहनांच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचा टोल जमा होतो. फास्टॅग असलेल्या वाहनांना टोल नाक्यावर थांबायला लागू नये हा हेतू आहे. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी कर्मचारी टोल नाक्यावर असल्याने अजूनही त्याठिकाणी वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात. अनेकदा रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तेथील वाहनांच्या गर्दीचा त्रास सोसावा लागत आहे.

अनेकदा फास्टॅग रीड होत नाही. मोहोळकडून सोलापूरकडे येताना सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे आठवड्यातील बहुतेक दिवस विशेषत: शनिवार, रविवारी टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगाच दिसतात. काहीवेळा एक-दोन लेन कर्मचाऱ्यांअभावी बंद ठेवल्या जातात. वाहने अस्ताव्यस्त थांबणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी लागणारे कर्मचारीही सावळेश्वर टोल नाक्यावर कमीच आहेत. त्याचा नाहक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

‘टीईटी’ देऊन निघालेले शिक्षक अडकले रांगेत

रविवारी (ता. २३) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पार पडली. सोलापूर शहर-जिल्ह्यातील सुमारे १९ हजार शिक्षक व उमेदवारांनी परीक्षा दिली. सोलापूर शहरातील ३४ केंद्रांवर ही परीक्षा झाली. मोहोळ, माळशिरस, माढा, करमाळा अशा तालुक्यांमधून परीक्षेसाठी सकाळी नऊ वाजता सोलापुरात आलेले शिक्षक-उमेदवार सायंकाळी गावी निघाले होते. सावळेश्वर टोलवरील वाहनांच्या रांगेत १५ ते २० मिनिटे थांबावे लागल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT