महाराष्ट्र बातम्या

आता उद्धव ठाकरेचंही 'लाव रे ती क्लिप'! देवेंद्रजी, लाज बाळगा म्हणत केली कडाडून टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची आज बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार आणि भाजपवर कडाडून टीका केली. तसेच रेडे गेलेत गुवाहाटीला असं म्हणत उद्धव यांनी शिंदे गटाला हिणवलं. तसेच लाव रे ती ऑडिओ क्लीपप्रमाणे भाजपवर हल्लाबोल केला. Uddhav Thackeray news in Marathi)

उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांची जुनी ऑडियो क्लीप लावून फडणवीसांचं जुनं भाषण जाहीर सभेत ऐकवलं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, मध्यप्रदेश सरकारने साडेसहा हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांचे वीजबील माफ केलं होतं. या सरकारने देखील मध्यप्रदेश पॅटर्न राबवायला हवा, असंही फडणवीस म्हणताना ऐकायला येत होते. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत शेतकऱ्यांची वीजबिल माफी करून दाखवा, असं आव्हान फडणवीसांना दिलं. याआधी मनसे प्रमुख राज ठाकरे देखील लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपवर हल्लाबोल करायचे.

उद्धव यांनी यावेळी खोक्यांवरून शिंदे सरकारवर आणि बुलडाणा जिल्ह्यातील बंखोरांवर टीका केली. विदर्भातील खासदार बाईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. आता ईडी, सीबीआयची हिंमत आहे का आता चौकशी करायची, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव यांनी भावना गवळी यांच्यावर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

पुन्हा भेटू... स्टार प्रवाहची आणखी एक मालिका घेतेय निरोप; शेवटच्या भागाचं शूट संपलं, शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT