Nrendra Modi Nashik Visit 
महाराष्ट्र बातम्या

Nrendra Modi Nashik Visit: "मंदिर एकदम चकाचक तरी मोदींनी..."; ठाकरे गटाची खोचक टीका

पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चकाचक केले. या कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले.

Sandip Kapde

Nrendra Modi Nashik Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील श्री काळाराम मंदिरात स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. यावेळी तो मंदिराच्या आवारात साफसफाई केली. दिसला. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या एका कार्यक्रमात याचा उल्लेख केला आणि देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन देशवासियांना केले. दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काळाराम मंदिर दौरा केला. पंतप्रधान येणार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते 5 दिवसापासून साफ सफाई करत होते. त्यांनी मंदिर एकदम चकाचक केले. या  कामासाठी 8 ते 10 लाख खर्च केले. मंदिर ट्रस्ट ने देखील सफाई वर 2 ते 4 लाख खर्च केल्याचे समजते. अनेक ठिकाणी फरशीवर लाल गालिचे टाकले होते. तरीही आपल्या पंतप्रधान महोदयांनी हाती मॉप घेऊन सफाई दर्शन केलेच! याची खरंच गरज होती काय? याचा अर्थ असा की सरकारने सफाई वर खर्च केलेले 10 ते 12 लाख रुपये वाया गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे. पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी भेटायला पाहिजे होत. नाशिक जिल्हा हा देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक जिल्हा आहे, पण कांदा निर्यात बंदीमुळे इथला शेतकरी पार कोलमडून पडलाय.पंतप्रधान या शेतकऱ्यांना का भेटले नाहीत?, असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

राजकारण करायला वेळ आहे, पण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत. भाजपला केवळ धर्माच्या नावावर राजकारणाची भाकरी भाजण्याचं काम येतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT