dhananjay munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : ओबीसी मेळाव्यांना अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी; धनंजय मुंडेही सोबतीला...

संतोष कानडे

OBC Laxman Hake : लोकसभा निवडणुकांच्या अगोदर झालेल्या ओबीसी मेळाव्यांना पंकजा मुंडे कधीही हजर राहिल्या नाहीत. धनंजय मुंडेदेखील ओबीसी मेळाव्यांना अनुपस्थित असायचे. परंतु आता लोकसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी दाखल झाले.

राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके हे ओबीसींच्या हक्कासाठी जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले आहे. ओबीसींचं आरक्षण टिकावं आणि सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करु नये, या मागणीसाठी हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरु आहे.

वडीगोद्री येथील हाकेंच्या उपोषणस्थळी सोमवारी रात्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी पंकजा मुंडे यांनी भावना व्यक्त करताना सरकारने ओबीसींच्या हक्कांकडे लक्ष दिलं पाहिजे, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, अशी मागणी केली.

यावेळी धनंजय मुंडे यांचीदेखील उपस्थिती होती. विशेष म्हणजे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं दुसरं उपोषण धनंजय मुंडेंच्या मध्यस्थीने सुटलं होतं. आता मात्र मुंडेंनी त्यांनी ओबीसींच्या मंचावर जावून भूमिका घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंची भूमिका बदलली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी भुजबळांना वेगळी भूमिका घेण्याची विनवणी केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत मोठी कारवाई! विद्यार्थ्यांवर ड्रग्जमाफियांचा डोळा, ४१.६० लाखांच्या अमली पदार्थांसह तस्कर जेरबंद

Marathi Live Updates News: दर्शनासाठी आलेला भाविक पडला थेट खड्ड्यात

SCROLL FOR NEXT