OBC Melava Ahmednagar
OBC Melava Ahmednagar 
महाराष्ट्र

OBC Melava Ahmednagar: मराठा समाज ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपवून टाकेल; छगन भुजबळांनी वाचून दाखवलं हायकोर्टचे जजमेंट

Sandip Kapde

OBC Melava Ahmednagar: राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना आरक्षणाबाबत नवीन अधिसूचना दिली. यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात ओबीसी मेळावा घेणार असल्याची घोषणा भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार आज अहमदनगर येथे ओबीसी मेळावा पार पडला.

छगन भुजबळ म्हणाले, २७ तारखेला गुलाल उधळला तर परत उपोषण कसलं करताय. ते म्हणाले आरक्षण मिळालं, हातात कागद घेतला अन् म्हणाले अध्यादेश आलाल. लेकाला अध्यादेश आणि नोटिफिकेशनला मसुदा म्हणजे काय माहित नाही. आज चार दिवस झाले राज्यात उन्माद सुरु आहे. ओबीसी लोकांच्या घरासमोर शिविगाळ सुरु आहे. डिजे वाजवले जात आहेत.

एक-एक गोष्ट मागण्यासाठी राज्यातील वेगवेगळे घटक लढत असताता पण त्यांना काही मिळत नाही. आणि यांनी सांगितलं उपोषणाला बसणार तर सरकारची धावपळ सुरु. मी आताही सांगतो मराठा समाजाला माझा विरोध नाही, त्यांना आरक्षण मिळालं पाहीजे असं म्हणणारे आम्ही आहोत. पण ते वेगळं द्या. आमच्या ताटातील देऊ नका, असे छगन भुजबळ म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीला गेले मला त्यांचा अवमान करायचा नाही. ते मोर्चाला सामोरे गेले माझा विरोध नाही. पण त्यांनी जाहीर केलं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ पूर्ण केली. मला प्रश्न असा पडला की शपथ पूर्ण झाली तर ओबीसी आयोग सर्वेक्षण कशासाठी करत आहेत. हे खोटं आहे का? बोगस सर्वेक्षण सुरु आहे. जात विचारली की सर्व आपोआप भरलं जात, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

क्यूरेटीव्ह पिटीशनमध्ये जे झालं ते दुरुस्त करण्यासाठी तीन-तीन न्यायाधीश बसवले. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांपेक्षा त्यांना पगार जास्त आहे. आरक्षण मिळालं तर हे सर्व कशासाठी करत आहेत. याची उत्तरे कशी शोधायची. खोटे रेकॉर्ड तयार करण्यात येत आहेत. ए टू झेड सर्व कुणबी एक देखील दुसरा कोणी नाही. पुरावे निर्माण करण्यात येत आहे. खोडाखोड करण्यात येत असल्याचा आरोप छगन भुजबळ म्हणाले. हा खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी ३६० कोटी रुपये देण्यात आले.

सगेसोयरे म्हणजे खोटे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. खोटी प्रमाणपत्र, खोटी वंशावळ जुळवण्याचे प्रकार घडत आहेत, असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

यावेळी छगन भुजबळ यांनी हायकोर्टाचा जजमेंट वाचून दाखवले. हायकोर्टाने  म्हटले आहे, कुणबी हा धंधा होता. त्यांची जात मराठा होती. मराठा समाजाला कुणबी दाखले दिले तर सगळा मराठा कुणबी होईल आणि ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपवून टाकेल. त्याला काही अर्थ राहणार नाही. हे सर्व सरकारच्या लक्षात येत नाही का?, असे भुजबळ म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT