Chhagan Bhujbal Lakshmipuri Police Maratha Community esakal
महाराष्ट्र बातम्या

OBC Melava : छगन भुजबळ यांची हिंगोलीमधील सभा उधळून लावण्याचा इशारा; नांदेड विमानतळावर चोख बंदोबस्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मराठवाड्यातल्या हिंगोली येथे रविवारी ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. परंतु हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला आहे.

'टीव्ही ९ मराठी'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. स्वराज्य संघटनेने सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्याने सभास्थळी आणि नांदेड विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

सकाळी १० वाजता नांदेड विमानतळावर छगन भुजबळ यांचं आगमन होणार आहे. जालना येथील सभेमध्ये त्यांनी केलेल्या आक्रमक भाषणामुळे ओबीसी नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आज (रविवारी) भुजबळ काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सभेसाठी जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु रविवारी ते हैदराबादकडे रवाना झाले आहेत. छगन भुजबळ हे नांदेडवरुन कारने हिंगोलीकडे रवाना होणार आहेत.

मागच्या काही दिवसांपासून भुजबळांच्या भाषणावर नाराजी जाहीर झाली होती. अजित पवार यांनीही समज दिल्याचं खुद्द भुजबळांनी कबूल केलं. त्यामुळे भुजबळ आज सौम्य भूमिका घेतात का, हे बघावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT