महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : ''गावबंदी करणाऱ्याला तुरुंगात पाठवा'', भुजबळांनी सांगितला कायदा

सकाळ डिजिटल टीम

हिंगोलीः हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा झाला. राज्यातील ओबीसींचे दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित होते. छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा गावबंदीवरुन मराठा समाजाला फटकारलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, घटनेतल्या कलम १९वरुन कुणालाही कुठेही संचार करण्याची मुभा आहे. जर कुणी गावबंदी केली किंवा अडवलं तर त्याला एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. असं कुणी करत असेल तर त्याला तुरुंगात पाठवा, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.

भुजबळ पुढे म्हणाले की, रोहित पवार, राजेश टोपे यांचं गावात स्वागत होतं आणि दुसरीकडे दानवेंना गावबंदी असते, असं का? मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसींमधून देऊ नका.. जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला आमचा विरोध आहे.

मराठा समाजाने ८५ टक्के सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत. इतर सुविधाही त्यांना मिळतात. काही ठिकाणी ओबीसी समाजापेक्षा जास्तीच्या सुविधा त्यांना मिळतात, त्या सुविधा ओबीसी समाजाल मिळाल्या पाहिजेत. जे सारथीला मिळतं, ते ओबीसींना मिळालं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ पुढे बोलले, ओबीसी नेत्यांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. माझ्याकडे नेतृत्व द्या किंवा नका देऊ.. तुम्हीच पुढे व्हा, हा लढा सुरु ठेवा. परंतु आपल्यातील मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत. असं म्हणत भुजबळांनी ओबीसी नेत्यांनाच सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhiraj Seth: भारताला मिळाले नवे लष्करप्रमुख! कोण आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ?

Ambassador Job: सरकारी नोकरी नाही, थेट राजदूत बनण्याची संधी! सरकारची महत्त्वाची घोषणा; नेपाळमध्ये मोठी हालचाल, कुणाला संधी मिळणार?

Horoscope : पुढचे दोन दिवस धनकृपा योगाचा प्रभाव! 'या' 4 राशींना अनपेक्षित धनलाभ; व्यवसायात प्रचंड फायदा, करियरसाठी मोठी गुड न्यूज

Mumbai News: सौंदर्य स्पर्धेतील उपविजेती बँकॉकहून आली; मुंबईत थेट कस्टमच्या जाळ्यात अडकली, प्रसिद्ध मॉडेलवर मोठी कारवाई

ST Employees Protest: प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको, प्रताप सरनाईकांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT