Chandrakant Patil
Chandrakant Patil  google
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा प्रश्न मुळीच सोडणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडी सरकारने आश्वासन पूर्ततेबाबत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांची फसवणूक केल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज विधानसभेत निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी आघाडीवर निशाणा साधला आहे. मविआ सरकारने २८ फेब्रुवारी रोजी जे मान्य केलं किमान ते तरी पूर्ण करायला हवं होत. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही मराठा आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न मुळीच सोडणार नाही असा सूचक इशारा यावेळी दिला.

ते म्हणाले, सगळ्या समाजाचा मिळून महाराष्ट्र देश आहे हे मान्य आहे. पण महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरीषदेत १३८ मराठा आमदार असताना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोणाही आवाज उठवला नाही. संभाजीराजेंना उपोषण करावे लागले. उपोषणामध्ये १५ कलमी नियमावली पायदळी तुडवले जाते. मात्र मविआ सरकारने २८ फेब्रुवारी रोजी ज्या मागण्या मान्य केल्या त्या पूर्ण करायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली.

आज सभागृहात अजित पवार यांनी या प्रश्नावर मौन बाळगले. मात्र आम्ही गप्प बसणार नाही. पुढच्या तीन दिवसात हा प्रश्न सातत्याने उपस्थित करणार. खूर्चीसाठी समझोता करण्याचे आता काही राहिले नाही असेही ते म्हणाले.

शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी व्हावी याविषयी बोलताना ते म्हणाले, सभागृहात सुधीर मुनगुंटीवर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करा असा आग्रह धरण्याचा मुद्दा उपस्थित करतात. अजितदादा म्हणतात आम्ही १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करणार. आणि त्यांच्या म्हणणाल्या समर्थन देण्यासाठी मुनगुंटीवर उभे राहतात. तुम्ही कशा-कशाचे समर्थन करणार आहात. आज तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्याला अप्रत्यक्षरित्या समर्थन केले आहे. एकीकडे तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला जाता आणि दुसरीकडे म्हणता शिवजयंती तिथीप्रमाणे करा. केवळ खूर्ची टिकवण्यासाठी हा दुटप्पीपणा सुरु आहे असा आरोपही केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

MI vs LSG Live Score IPL 2024 : लक्ष रोहित अन् हार्दिकवरच! मुंबई अन् लखनौ शेवट गोड करण्यासाठी भिडणार

Lok Sabha Election 2024 : ‘ते’ राममंदिरावर बुलडोझर घालतील; पंतप्रधान मोदींची ‘सप’, ‘काँग्रेस’वर टीका

Video: अंधाराचा फायदा घेऊन त्यानं तरुणीला गाठलं अन्...; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : शरद पवार, अरविंद केजरीवाल भिवंडीतील सभेत दाखल

SCROLL FOR NEXT