OBC Reservation Marathi News sakal
महाराष्ट्र बातम्या

OBC Reservation : मध्य प्रदेशला दिलाशानंतर भाजपची मविआ सरकारवर टीका

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. या निकालानंतर आता भाजपनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारवर टीका करताना चुकीच्या धोरणांमुळं राज्यातील ओबीसी बांधव हक्कांपासून वंचित असल्याचं म्हटलं आहे.

बावनकुळे म्हणाले, मध्य प्रदेश सरकारनं ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी चार महिन्यात यशस्वी प्रयत्न केले. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला १३ डिसेंबर २०१९ रोजी पहिला निर्णय दिला होता. तेव्हापासून चार महिन्यात महाराष्ट्र सरकारलाही हे करता आलं असतं. पण मी वारंवार सांगायचो की या सरकारमधील झारीतील शुक्राचार्य जे आहेत, त्यांना ओबीसीच्या जागेवर धनदांडग्या लोकांना निवडून आणायचं आहे, हा त्यांचा मनसुबा आहे. मंत्री मोडते घालत होते, मंत्रालयात काम चालू नव्हतं. कधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्यानं घेतलं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टानं वारंवार फटकारल्यानंतर कोर्टाला विश्वासच राहिला नाही की, हे राज्य सरकार ओबीसीच्या बाजूनं आहे. म्हणून शेवटी कोर्टानं महाराष्ट्रात निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

या सरकारने ओबीसी आयोगाला पैसा दिला नाही. पहिला आयोग रद्द केला नंतर दुसरा आयोग आणला. पुढे डेटा तयार केला नाही त्यामुळं केवळ आणि केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळं आणि ओबीसीविरोधी धोरणामुळं आरक्षण गेलं आहे. यांना आता जनता सोडणार नाही, अशा शब्दांत बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT