Laxman Hake esakal
महाराष्ट्र बातम्या

Laxman Hake: OBC आरक्षण पेटलं! ५४ लाख कुणबी नोंदी रद्द करा, लक्ष्मण हाके आक्रमक! फडणवीसांसोबत फोनवर चर्चा

Laxman Hake : आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर होते.

Sandip Kapde

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, अशी मागणी करत लक्ष्मण हाके वडगोद्री येथे गेल्या ८ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा ९ वा दिवस आहे. सरकार म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मनोज जरांगे म्हणतात आम्ही ओबीसीत आलो. मग नेमकं खोटं कोण बोलतय?, असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर होते. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं.  ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची भूमिका आहे, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले. आज मुंबईत संध्याकाळी ५ वाजता याबाबत मिटींग होणार आहे.

यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणा करत सरकारवर संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. शिष्टमंडळातील नेत्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असं लक्ष्मण हाके यांनी ठामपणे सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट द्यावी, एका समाजाला रेड कारपेट आणि आमच्यावर अन्याय का? कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप करणे बंद करा, अशी मागणी देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आणि चर्चा करणार आहे. त्यानंतर हाके यांना सांगितले जाईल आणि उपोषणाबाबत निर्णय घेतला जाईल, असे सरकारने सांगितले. 

लक्ष्मण हाके यांच्याकडून जे शिष्टमंडळ मुंबईला चर्चा करायला जाणार आहे. यामध्ये धनंजय मुंडे, प्रकाश शेंडगे, छगन भुजबळ असतील. आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील फोनवरुन लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधला. (OBC Reservation Update)

गिरीश महाजन काय म्हणाले?

मार्ग निघाला पाहिजे ही सरकाची भूमिका आहे. आम्हाला लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीची काळजी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे सांगितलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ, असे महाजन म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT