maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: कोणतीही बनवाबनवी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे - मनोज जरांगे पाटील

सकाळ डिजिटल टीम

Maratha Reservation: मराठा कुणबींची पोट जात असून कोणत्याही पुराव्यांची गरज नाही असे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. यावेळी पोट जाती म्हणून बऱ्याचशा जाती आरक्षणात घेतल्या मग मराठा हा कुणबींची पोट जात होऊ का शकत नाही? असा प्रश्न यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी विचारला. याला कोणताही पुरावाची आवश्यकता नाही. यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्ती असावी लागेल असे ते यावेळी म्हणाले.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी करत उपोषण केले होते. त्यांच्या या उपोषणाची नोंद संपूर्ण महाराष्ट्राने घेतली होती. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण स्थळी जाऊन ते उपोषण सोडवले होते.

मात्र आता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यातील ओबीसी समाज प्रचंड विरोध करत आहे. यामध्ये ज्यांच्या निजामकालीन कुणबी नोंदी आहेत त्यांनाच हे प्रमाणपत्र देण्यात यावे असा निर्णय सरकारने घेतला आहे. अशावेळी मनोज जरांगे पाटील यांनी हिंगोली येथे याविषयी एक मोठे विधान केले आहे.

पोटजाती म्हणून बऱ्याचशा जाती आरक्षणात समाविष्ट करण्यात आल्या. मग मराठा हा कुणबींची पोट जात होऊ का शकत नाही? असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला. सरकारला पुराव्यांचा आधार हवा होता. 5000 पुरावे सरकारला मिळाले आहेत. यामुळे याच पुरावांच्या आधारे महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण सरकार देऊ शकतो. आता बहाणे बनवू नये असे यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

यावेळी ते असेही म्हणाले की, एका गावात एक जरी पुरावा मिळाला तरी संपूर्ण गावाला ओबीसी प्रमाणपत्र द्यावा लागेल. कारण गावात सर्वच लोक हे रक्ताचे नातेवाईक असतात. यामुळे प्रमाणपत्र सगळ्यांनाच द्यावे लागतील. आम्ही पाच हजार पुरावे मिळवून दिले आहेत. मराठ्यांचं आता सोनं होत आहे यामुळे आता कोणतीही बनवाबनवी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Gold Rate Today: दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! ऑक्टोबरमध्ये 7,000 तर उच्चांकापासून 38,000 रुपयांनी स्वस्त; मुंबई-पुण्यात भाव किती?

Maharashtra Live News : देऊळगाव राजा मधील दोन बड्या मसाला व्यावसायिकांवर एफडीएची धडक कारवाई, एक कोटींचा माल जप्त

Kolhapur Rickshaw Drivers RTO Report : 'सायेब, कुठं जाणार? चला की सोडतो...'; कोल्हापूरच्या रिक्षाचालकांचे मराठी खणखणीत; परीक्षेची गरजच नसल्याचा पाठविला अहवाल

SCROLL FOR NEXT