Gopichand_padalkar 
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारला फडणवीसांचं म्हणणं उशिरा कळलं - गोपीचंद पडळकर

सकाळ डिजिटल टीम

राज्याला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत न घेण्याचा निर्णय रद्द ठरवला आहे.

राज्याला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत न घेण्याचा निर्णय रद्द ठरवला आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ओबीसींच्या मुळावर उठलेलं हे प्रस्थापितांचे महाआघाडी सरकार असल्याचं आता सिद्ध करण्याची गरज उरली नाही असे ते म्हणाले.

पडळकर यांनी म्हटलं की, ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यात कुठलही राजकारण न करता आम्हीही त्यास पाठींबा दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द ठरवला आहे.

विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच याविषयीचे वारंवार संकेत दिले होते. आपलं म्हणणे मांडले होते पण या प्रस्थापितानी केंद्राकडे बोट दाखवत सेन्ससचा डेटा की इंपेरिकल डेटा असा वाद घातला. जर वेळ वाया न घालवता इंपेरिकल डेटा गोळा केला असता तर आणि त्वरित न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असती तर ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळालं असतं असेही पडळकर म्हणाले.

आता उशिरा त्यांना देवेंद्र फडणवीसांचं म्हणनं कळून चुकलंय आणि मान्यही केले की इंपेरिकल डेटा शिवाय आपल्याला हे ओबीसींचं राजकीय आरक्षण खेचून आणता येणार नाही. परंतु आताही राज्यमागासवर्ग आयोगाला बसायला साधं ॲाफीस नाही. डेटा गोळा करण्यासाठी व त्याची शास्त्रशुद्ध मांडणी करण्यासाठी नेमकं आपण कोणत्या एजन्सीला अपॅाईंट केलाय का ? असा सवाल पडळकरांनी विचारला आहे.

आता तरी कामाला लागा, स्वताच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका. लवकारत लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी राज्यसरकारला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT