OBC Reservation Marathi News sakal
महाराष्ट्र बातम्या

अहवाल नाकारला! पुढील आदेशापर्यंत OBC आरक्षण नाहीच: सुप्रीम कोर्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. पुढच्या आदेशापर्यंत निवडणुकीपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण नसेल, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आज याबाबत सुनावणी झाली असून त्यामध्ये हा निकाल आला आहे. थोडक्यात, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्याला आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% ओबीसी कोटा देण्याची शिफारस केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालावर कार्यवाही करण्यापासून रोखलं आहे.

पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटलंय की, हा अहवाल प्रायोगिक अभ्यास आणि संशोधनाशिवाय तयार करण्यात आला आहे. या रिपोर्टमधून राजकीय प्रतिनिधीत्व कुठेही प्रतिबिबींत होत नाहीये, लोकल बॉडीनुसार येणारं प्रतिनिधीत्वही दिसून येत नाहीये. तारीखही नीटसी नाहीये. नेमका कुठल्या कालावधीत ही आकडेवारी गोळा केलीय, याचीही स्पष्टता येत नाहीये, त्यामुळे आता हा अहवाल नाकारण्यात येत आहे. तसेच या निर्णयानुसार, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेता येणार नाहीयेत. (OBC Reservation News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Kailas Patil : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय’ या सहकार मंत्र्यांच्या वक्तव्यावर आमदार कैलास पाटलांची घणाघाती टीका

Pune News : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत एनडीए कॅडेटने संपविले जीवन

Latest Marathi News Live Update : गोळीबार प्रकरणातील आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी

Palghar News : पालघरमध्ये ठाकरे गटाला भगदाड; गटनेता कैलास म्हात्रेसह चार नगरसेवक भाजपाकडे

Donald Trump यांचे Nobel चे स्वप्न धुळीस मिळाले; व्हाईट हाऊसचा संताप उफाळला, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT