mumbai high court esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai : पोक्सो कायदा लैंगिक शोषण रोखण्यासाठी, पण संबंध सहमतीने...; HCचे निरीक्षण

रवींद्र देशमुख

मुंबई : अल्पवयीन मुलांसाठी असलेला पोक्सो कायदा मुलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी असून जे नातेसंबंध सहमतीने आहेत त्यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले आहे.

अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीत आरोपीविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. आरोपीचे वय बावीस वर्षे असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील दोन वर्षे तो कारागृहात आहे. या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे याचिकेवर सुनावणी झाली. पोक्सो कायदा अल्पवयीन मुलांना लैंगिक शोषणापासून संरक्षण मिळण्यासाठी आहे; मात्र प्रेमसंबंध किंवा सहमतीने आलेल्या संबंधांसाठी शिक्षा करणारा नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

घटना काय?

संबंधित घटना घडली तेव्हा पीडित अल्पवयीन होती, ती आरोपीबरोबर पळून गेली आणि दोन-तीन दिवस बाहेर होती; मात्र घरी आली तर आई-वडील ओरडतील, या भीतीने घरी आली नाही. त्यामुळे घरच्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आले होते.

तेव्हापासून तो कारागृहात आहे. आरोपीचे वय लहान आहे आणि संबंधित खटला लवकर सुरू होणार नाही. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करत आहे, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. मुलीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते, असे आईने जबाबात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT