Prithviraj Chavan sakal
महाराष्ट्र बातम्या

Prithviraj Chavan : गरिबांच्या धान्यावर अधिकाऱ्यांचा डल्ला;विधानसभेत माहिती उघड,संबंधितांवर कारवाईची मागणी

राज्यातील एक लाख २६२ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत सरकारकडून गरजूंसाठी दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यावर डल्ला मारला असल्याची धक्कादायक माहिती विधानसभेच्या लेखी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उघडकीस आल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरले.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील एक लाख २६२ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत सरकारकडून गरजूंसाठी दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यावर डल्ला मारला असल्याची धक्कादायक माहिती विधानसभेच्या लेखी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उघडकीस आल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरले.

गरजूंच्या तोंडच्या घासावर सरकारी कर्मचाऱ्यांनी डल्ला मारला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले जातील, असे आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिले. राज्यातील बुधवारी आमदार संजय सावकारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राम सातपुते, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

‘‘राज्यातील १ लाख २६२ अधिकारी आणि कर्मचारी यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील तीन हजार १२३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या शिधापत्रिका योग्य योजनेत वर्ग करण्याच्या सूचनाही सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत,’’ असे भुजबळ यांनी सुरुवातीला सांगितले.

गोपनीय अहवालात नोंद करावी’

भुजबळ यांच्या उत्तराने समाधान न झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘कोणताही गरजू उपाशीपोटी राहू नये यासाठी अन्न सुरक्षेची योजना आहे. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला ७० हजार रुपयांपेक्षा कमी वेतन नाही. याचा अर्थ गरजूंच्या तोंडचा घास सरकारी कर्मचाऱ्यांनी पळवला आहे. हे सरकारी कर्मचारी कोणत्या वर्गातले आहेत याची माहितीही सभागृहापुढे येणे आवश्यक आहे.’’ ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये याबाबतची नोंद केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT