Teacher Media Gallery
महाराष्ट्र बातम्या

आठवी ते बारावीची भरणार ऑफलाइन शाळा ! शिक्षकांना राहावे लागणार गावातच

आठवी ते बारावीची भरणार ऑफलाइन शाळा ! शिक्षकांना राहावे लागणार गावातच

तात्या लांडगे

आता कोरोनामुक्‍त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा ऑफलाईन भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षकांना गावातच राहावे लागणार आहे.

सोलापूर : शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. मानसिक तणावाखाली काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून शारीरिक व मानसिक दुष्परिणाम त्यांच्यात दिसू लागले आहेत. अनेकांकडे ऍन्ड्राईड मोबाईल नाहीत. या पार्श्‍वभूमीवर आता कोरोनामुक्‍त (Covid-19) गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा ऑफलाईन भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षकांना गावातच राहावे लागणार आहे. (Offline schools will start from eighth to twelfth in the state)

राज्यातील कोरोनाची आकडेवारी पाहिली तर सध्या दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोना होण्याची शक्‍यता सर्वाधिक आहे. तर 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना सध्या कमी धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शाळा बंद असल्याने मुलांमध्ये चिडचिडपणा, मानसिक आजारात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्‍टिव्हीटीचा अडथळा आहे. त्यामुळे मुलांना शिक्षण घेणे कठीण बनले आहे. त्यामुळे निकषांचा आधार घेऊन शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शाळांना गावकरी, पालकांसोबत ठराव करून घ्यावा लागणार आहे. तिसऱ्या लाटेची शक्‍यता असतानाही शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, शाळा सुरु करण्याचा निर्णय घेताना तो आपल्या अंगावर येऊ नये याची पुरेपूर काळजी शिक्षण विभागाने घेतल्याची चर्चा आहे.

शाळा सुरू करण्याचे निकष...

  • कोरोनामुक्‍त गावांमध्ये आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरु करण्यास मान्यता

  • शाळा सुरु करताना मुलांना टप्प्याटप्याने बोलवावे; वर्गांची अदलाबदली करून सकाळी, दुपारी भरवावी शाळा

  • इंग्रजी, विज्ञान, गणीत या विषयांनाच द्यावे प्राधान्य

  • एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा; दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे

  • एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत

  • सतत हात साबणाने स्वच्छ धुवावेत, मास्कचा वापर करावा

  • कोरोनासदृश लक्षणे असलेल्या मुलास तत्काळ घरी पाठवावे; त्याची कोरोना चाचणी करावी

  • शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात असावी; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर प्रवासासाठी करू नये

कोरोनामुक्‍त गाव कसे ठरवायचं?

सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील गावांमध्ये काही प्रमाणात कोरोना वाढतच आहे. तर काही गावांमधील कोरोना कमी झालेला नाही. दरम्यान, एक गाव कोरोनामुक्‍त झाले असून त्याच्या शेजारील गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. दुसरीकडे अनेक गावे कोरोनामुक्‍त झाली आहेत. परंतु, शाळा सुरू करण्यासंदर्भात कोरोनामुक्‍त गावाचा निकष काय असणार, याचे आदेशात स्पष्टीकरण नाही. त्यामुळे एक-दोन दिवसांपूर्वी कोरोनामुक्‍त गावातही शाळा सुरू होतील का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT