Maharashtra Sadan Delhi sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Sadan : जुन्या महाराष्ट्र सदनाचा ‘मास्टर प्लॅन’

राज्य अतिथीगृहाचा दर्जा असलेले महाराष्ट्र सदन केवळ आमदार-खासदार यांच्या निवासापुरते मर्यादित नाही. तर एक प्रकारे देशाच्या राजधानीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सदनाकडे आहे.

सम्राट कदम

राज्य अतिथीगृहाचा दर्जा असलेले महाराष्ट्र सदन केवळ आमदार-खासदार यांच्या निवासापुरते मर्यादित नाही. तर एक प्रकारे देशाच्या राजधानीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सदनाकडे आहे.

पुणे - युक्रेनमधील मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुखरूप पोचविण्याची व्यवस्था असो किंवा राज्य आणि केंद्र सरकारमधील समन्वयाची भूमिका! नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाने नेहमीच राज्य दूतावास म्हणून चोख भूमिका बजावली आहे. आता त्याही पुढे जात भावी मराठी अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. ‘यूपीएससी’च्या पूर्व परीक्षेचा टप्पा पार केलेल्या विद्यार्थ्यांसाठी जुन्या महाराष्ट्र सदनच्या जागेवर वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

राज्य अतिथीगृहाचा दर्जा असलेले महाराष्ट्र सदन केवळ आमदार-खासदार यांच्या निवासापुरते मर्यादित नाही. तर एक प्रकारे देशाच्या राजधानीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सदनाकडे आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांची राहण्याच्या सोयी बरोबरच त्यांना आवश्यक मार्गदर्शन पुरविण्याची व्यवस्थाही महाराष्ट्र सदन करते. भावी मराठी अधिकाऱ्यांसाठी नव्या प्रकल्पाबद्दल सांगताना सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार सांगतात,‘‘केंद्रीय प्रशासकीय सेवेत मराठी टक्का वाढावा म्हणून महाराष्ट्र सदन नेहमीच प्रयत्नशील राहीले आहे. आता जुन्या महाराष्ट्र सदनाच्या जागेवर ५०० मुलांचे आणि ५०० मुलींचे वसतिगृह उभारण्याचा मानस आहे. जेथे पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि अभ्यासाची सोय करता येईल. संबंधित प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.’’

महाराष्ट्र सदन म्हणजे काय?

परदेशामध्ये ज्या प्रमाणे आपल्या देशाचा दूतावास असतो. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीत प्रत्येक राज्याचा दूतावास अथवा राज्य अतिथिगृह आहे. महाराष्ट्राचे दूतावास महाराष्ट्र सदन म्हणून ओळखले जाते. नव्यानेच बांधलेल्या इमारतीमुळे सध्या जुने आणि नवे असे दोन सदन उपलब्ध आहेत.

सदनाचे काम

  • राज्यातील आमदारांपासून ते मुख्यमंत्री आणि राज्‍यपालांपर्यंत सर्वांची राहण्याची व्यवस्था करणे.

  • कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या दिल्लीतील महत्त्वाच्या बैठका व दौऱ्याचे नियोजन करणे.

  • केंद्र आणि राज्यातील विविध करार, कायदे, योजनांसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता, अधिकाऱ्यांचा समन्वय आणि पाठपुरावा करणे

  • आकस्मित स्थितीत राज्याची मदत करणे

सुविधा

  • युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची सात दिवस मोफत निवासाची व्यवस्था

  • नव्या महाराष्ट्र सदनात प्रत्येक खासदारासाठी १० दिवस माफक दरात निवासाची सोय

  • महाराष्ट्रातील अभ्यागता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ठरलेल्या शुल्काप्रमाणे निवासाची उपलब्धता

  • जुन्या महाराष्ट्र सदनात ५०० रुपये प्रति दिवस निवासाचे शुल्क

  • मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या निवासाबरोबरच दर शनिवार आणि रविवार मुलाखतीची विशेष तयारी करून घेतो. महाराष्ट्रातील विविध अधिकारी या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतात. आता पूर्व परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी हा नवा प्रकल्प आम्ही आखला आहे.

- डॉ. राजेश अडपावार, सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पतीने केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT