Government Employee Strike esakal
महाराष्ट्र बातम्या

Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी संपाकडे लिपिक फिरविणार पाठ; संपात सहभागी न होण्याचा निर्णय

लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य सर्व कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी येत्या गुरुवारपासून (ता.१४) सुरू होत असलेल्या सरकारी कर्मचा-यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

यामुळे या आंदोलनात पुणे जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी संपात सहभागी न होता, नियमितपणे कामावर हजर राहणार असल्याचे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी सांगितले.

मात्र पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मिळून अठरा कर्मचारी संघटना कार्यरत आहेत. लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता अन्य सर्व कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी विविध कर्मचारी संघटनांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. दरम्यान, गेल्या मार्चमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला होता.

हा संप मागे घेताना एक समिती नेमून, यावर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र सुमारे आठ महिने होऊनही अद्याप याबाबत निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT