4 ते 7 दिवसांत ओमिक्रॉनवर मात! दोन्ही डोस घेतलेल्यांना धोका कमीच esakal
महाराष्ट्र बातम्या

4 ते 7 दिवसांत ओमिक्रॉनवर मात! दोन्ही डोस घेतलेल्यांना धोका कमीच

4 ते 7 दिवसांत ओमिक्रॉनवर मात! दोन्ही डोस घेतलेल्यांना धोका कमीच

तात्या लांडगे

राज्यात सद्य:स्थितीत ओमिक्रॉनचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या 108 हून अधिक झाली आहे.

सोलापूर : राज्यात 4 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा (Omicron) पहिला रुग्ण आढळला आणि सद्य:स्थितीत ओमिक्रॉनचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या 108 हून अधिक झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ज्यांनी प्रतिबंधित (Covid Vaccine) लस घेतली, त्यांच्यात विषाणूची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवली नसून ते सर्वजण चार ते सात दिवसांत बरे होऊन घरी परतले आहेत. परंतु, राज्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून दुसरीकडे ओमिक्रॉनचेही रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने (Maharashtra State Government) गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लागू केले असून, रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत रात्रीची जमावबंदीही लागू केली आहे. (Omicron infected patients recovered in four to seven days and returned home)

कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव रोखणे, नागरिकांमधील रोगप्रतिकारक शक्‍ती (Immunity) वाढविण्याच्या उद्देशाने 16 जानेवारीपासून कोविशिल्ड (Covishield) लस टोचण्यास प्रारंभ झाला. या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर एक ते दीड महिन्यात दुसरा डोस घ्यावा, असा पहिल्यांदा निकष ठेवण्यात आला. परंतु, लसीकरणासाठी (Vccination) मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली, तेवढ्यात राज्य सरकारने मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी दोन्ही डोसमधील अंतर 84 दिवसांचे करण्यात आले. तर कोवॅक्‍सिन (Covaxin) लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा, असा निकष लावण्यात आला. काही ठिकाणी रशियाची (Russia) स्पुटनिक (Sputnik) लसदेखील टोचण्यात आली. परंतु, राज्यात कोविशिल्ड व कोवॅक्‍सिन लसीलाच सर्वाधिक मागणी राहिली. राज्यातील 18 वर्षांवरील नऊ कोटी 14 लाख 35 हजार व्यक्‍तींनी लस टोचून घेणे अपेक्षित आहे. आता लसीकरणाला सुरवात होऊन जवळपास वर्ष झाले, तरीही राज्यातील एक कोटी 13 लाखांपर्यंत व्यक्‍ती लसीकरणापासून दूरच आहेत. दुसरीकडे, राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये दोन्ही डोस टोचणाऱ्यांची संख्या 55 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नाही. दरम्यान, सर्वांनी लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.

ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण, ज्यांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतले, ते चार ते सात दिवसांत बरे झाले आहेत. या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी सर्वांनीच प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत. आपल्याकडील नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्‍ती चांगली असून लस घेतल्यानंतर त्यात आणखी भर पडेल.

- डॉ. दिलीप म्हैसकर (Dr. Dilip Mhaiskar)), संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई (Mumbai)

राज्यातील लसीकरणाची स्थिती (23 डिसेंबरपर्यंत)

  • एकूण उद्दिष्ट : 9,14,35000

  • पहिला डोस घेतलेले : 7,93,48,389

  • दुसरा डोस टोचलेले : 5,07,47,863

  • लसीकरणात पिछाडीवरील जिल्हे : 17

लसीकरणात पिछाडीवरील जिल्हे

नांदेड (Nanded), बीड (Beed), नंदुरबार (Nandurbar) हे जिल्हे लसीकरणात सर्वात पिछाडीवर (75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी) आहेत. हिंगोली (Hingoli), धुळे (Dhule), परभणी (Parbhani), लातूर (Latur), अकोला (Akola), जळगाव (Jalgaon), यवतमाळ (Yawatmal), गडचिरोली (Gadchiroli), जालना (Jalna), बुलढाणा (Buldhana), नगर (Nagar), वाशिम (Washim), उस्मानाबाद (Osmanabad), नाशिक (Nashik) या जिल्ह्यांमधील लसीकरणाचे प्रमाण 75 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंतच आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 19 टक्‍के व्यक्‍ती अजूनही लसीकरणापासून दूरच आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या नजरेतून...

  • कोरोनाच्या तुलनेत ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक

  • इंग्लंडमध्ये 15 दिवसांत रुग्णसंख्या तीन टक्‍क्‍यांवरून 73 टक्‍क्‍यांवर

  • राज्यात ओमिक्रॉनचे शंभराहून अधिक रुग्ण; 54 रुग्ण झाले बरे

  • आपल्याकडील व्यक्‍तींमध्ये रोगप्रतिकारक शक्‍ती चांगली; प्रतिबंधित लसीचे दोन्ही घेणे आवश्‍यक

  • दोन्ही डोस घेतलेल्यांच्या तुलनेत एक डोस अथवा लस न घेतलेल्यांमध्ये ओमिक्रॉनची तीव्रता अधिक

  • लस घेतलेले ओमिक्रॉनचे रुग्ण चार ते सात दिवसांत बरे होऊन परतले घरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT