omicron is not vaccine for covid19 Gladstone University of California USA Published in international science journal Nature sakal
महाराष्ट्र बातम्या

ओमिक्रॉन म्हणजे ‘नैसर्गिक लस’ नाही

अमेरिकेतील शास्त्रज्ञांकडून गैरसमज दूर : लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉन हा कोरोनाची नैसर्गिक लस असल्याचा समज तयार झाला होता. तो चुकीचाच असल्याचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ग्लॅडस्टोन या संशोधन संस्थेच्या संशोधनातून उघड केले आहे. याबाबतचा शोधनिबंधही नुकताच ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजविला असून या महासाथीत लाखो नागरिकांचा बळी गेला. कोरोनाचा नवा प्रकार असलेला ओमिक्रॉन नोव्हेंबर २०२१ मध्ये जगासमोर आला. हा विषाणू म्हणजे कोरोनाची नैसर्गिक लस असल्याचा गैरसमज समाजात पसरला. यामुळे ग्लॅडस्टोन या संशोधन संस्थेने ओमिक्रॉनच्या अभ्यासावर डिसेंबर २०२१ पासून लक्ष केंद्रित केले होते. सलग चार महिने संशोधकांनी अभ्यास केला. ‘नेचर’मध्ये १८ मे रोजी शोधनिबंध प्रसिद्ध झाला. त्यानंतर संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे.

संमिश्र लशीवर संशोधन

ओमिक्रॉन विषाणूच मानवाला नैसर्गिक प्रतिकारशक्ती प्रदान करेल. त्यामुळे कोरोनाचा आपोआप नायनाट होईल, असा समज सर्वत्र झाला होता. मात्र हा समज या संशोधनातून सपशेल फोल ठरला आहे. ‘ओमिक्रॉनवर मात करण्यासाठी नवीन संमिश्र लस तयार होणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोनाच्या सर्व उपप्रकारांपासून संरक्षण मिळेल,’ असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. या नवीन लस निर्मितीबाबत ग्लॅडस्टोनने संशोधन अभ्यास सुरू केलेला आहे.

लसीकरण झालेल्यांना सुरक्षा कवच

आम्ही ४२ कोरोनाबाधित लोकांच्या रक्ताचे नमुने तपासले. तसेच प्राण्यांवरही चाचण्या केल्या. ज्यांनी लस घेतली नाही आणि ज्यांच्या शरीरात ओमिक्रॉनचा व्हायरस आहे अशा लोकांमध्ये ओमिक्रॉन सीमित आणि कमकुवत स्वरूपाची रोगप्रतिकारशक्ती प्रदान करतो. याउलट ज्यांनी लस घेतली आहे अशा लोकांच्या शरीरात ओमिक्रॉन व्यापक आणि दीर्घकालीन रोगप्रतिकारशक्ती (हायब्रिड इम्यूनी) तयार करतो. अर्थात लसीकरण झालेल्यांना कोरोनापासून सुरक्षेचे कवच मिळते.

लस न घेतलेल्या व्यक्तींमध्ये एकदा ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला असला तरी इतर कोरोना उपप्रकारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. बूस्टर डोसही घ्यावा.

- डॉ.जेनिफर डॉडेना, वरिष्ठ संशोधक, ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूट

आमच्या संशोधनामुळे लसीकरणाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. हे संशोधन नवीन लस तयार करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल. आमच्या लॅबसह १९ प्रयोगशाळांमधील संशोधकांनी या संशोधनासाठी परिश्रम घेतले.

- डॉ.मेलेनी ऑट, संचालक, ग्लॅडस्टोन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी

-(जितेंद्र विसपुते)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT