narendra modi uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

ओमिक्रॉनचा धोका, मुख्यमंत्री पंतप्रधानांशी चर्चा करुन घेणार निर्णय

नवा विषाणू धोकादायक असल्याची कॅबिनेटमध्ये माहिती देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या (coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron) सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. आज बैठकीत नव्या विषाणूबाबत (News virus) चर्चा झाली. मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलून निर्णय घेणार आहेत.

नवा विषाणू धोकादायक असल्याची कॅबिनेटमध्ये माहिती देण्यात आली. 13 देशातील प्रवासाबाब महत्वाचे निर्णय घेण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या कोरोना व्हायरसवर चर्चा झाली. यामध्ये सर्व मंत्र्यांचं म्हणणं होतं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सदर नियमावली बाबत चर्चा करावी.

आजच्या कॅबिनेट बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळ बैठकीत नव्या कोरोना व्हायरस बद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्हीसी द्वारे मंत्रीमंडळाला माहिती दिली. दुबईने 13 देशातून येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत जी नियमावली केली आहे तशाच प्रकारची नियमावली महाराष्ट्र मध्ये देखील असावी, याबाबत चर्चा झाली आहे. मंत्र्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT