महाराष्ट्र बातम्या

Omicron - महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवे नियम

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर नवे नियम जारी केले आहेत. त्यात विलगीकरण आणि आऱटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

मुंबई - कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रोनने आता जगाची चिंता वाढवली आहे. गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा हा नवा व्हेरिअंट जास्त संसर्गक्षम आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मंगळवारी ओमिक्रोनचा धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसदर्भात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. आता अशा प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणार राहणं बंधनकारक असणार आहे. नव्या यादीनुसार धोका असलेल्या देशांमध्ये युरोपिय देश, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, मॉरिशिअस, न्यूझीलंड, झिम्बॉम्बे, सिंगापूर, हाँगकाँग, इस्रायल यांचा समावेश आहे. या देशांमधून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची दुसऱ्या , चौथ्या आणि सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणीसुद्धा करण्यात येईल.

एखादा प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसंच जर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास ७ दिवसांसाठी घरातच विलगीकरणात ठेवण्यात येईल. राज्य सरकारने म्हटलं की, केंद्राकडून २८ नोव्हेंबरला ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी नियमावली ही किमान निर्बंध म्हणून काम करेल.

दरम्यान, महाराष्ट्रात दक्षिण आफ्रिकेसह धोका असलेल्या देशांमधून आलेले काही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सहा जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे जीनोम पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात ओमिक्रोनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मंगळवारी देण्यात आली होती.दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमधून आलेल्या व्यक्ती या मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पुण्यात आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये नायजेरियाहून आलेले दोन प्रवासी आहेत.

आरोग्य विभागाने सांगितलं की, सध्या जे सहा प्रवासी जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांचे नमुने जिनोम तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. जरी हे सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असले तरी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नाहीत अशीही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आजचे पंचांग 17 जुलै 2026! राहुकाल, शुभ मुहूर्त, चंद्रबळ आणि दिनविशेष

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींनी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT